1. बातम्या

अखेर शेतकरी वाट बघत असलेली बातमी आलीच! आता शेतीचे पंचनामे होणार अचूक आणि जलद, अँपची झाली निर्मिती

सध्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर त्यांचे पंचनामे होण्यास विलंब व्हायचा याचा विचार करून आता ई-पंचनामे केले जाणार आहेत. मागच्या काही काळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या ५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
agriculture Panchnama (image google)

agriculture Panchnama (image google)

सध्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर त्यांचे पंचनामे होण्यास विलंब व्हायचा याचा विचार करून आता ई-पंचनामे केले जाणार आहेत. मागच्या काही काळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या ५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

राज्यभरात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताहाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने बिदरी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांना ई- पंचनामे या उपक्रमाची माहिती दिली. बळीराजाला अस्मानी संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते यासाठी प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे केले जातात.

दरम्यान, हे पंचनामे आता अचूक आणि वेगाने घेता यावेत यासाठी ‘ई-पंचनामा’ हे अ‍ॅप बनवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

मोठी बातमी! शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील बीआरएसच्या पक्षात दाखल...

टेक्नॉलॉजीच्या मदतीने पंचनामा करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग नागपूर विभागात राबविण्यात येत आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, डिसेंबर २०१२ पासून यासंदर्भात मोबाइल अॅप्लिकेशन व सॉफ्टवेअर तयार करण्याची प्रक्रीया सुरू होती. याबाबत प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

पीक विमा भरण्यासाठी महाराष्ट्राला केवळ 3 दिवसांची मुदतवाढ, इतर राज्यात 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे व्हावेत, तसेच शासनाकडून मिळणाऱ्या सर्व प्रक्रिया पारदर्शी व गतिमान करण्यासाठी विभागात ई-पंचनामे हा अभिनव प्रयोग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कामे लवकरच होणार आहेत.

पुणे बाजार समितीला आली जाग, ९३ अडत्यांवर कारवाई, लाखांचा दंड वसूल...
पुणे जिल्ह्यात दोन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ७६ टक्के पाऊस, अजूनही काही तालुके पावसाच्या प्रतीक्षेत..

English Summary: Finally, farmers waiting arrived! agriculture Panchnama accurate fast, app created Published on: 03 August 2023, 03:10 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters