1. बातम्या

लासलगावात टोमॅटोला प्रतिक्रेट ५,१०० रुपये दर, टोमॅटोला दर टिकून असल्याने शेतकरी सुखावला...

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. आता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात हंगामातील टोमॅटो लिलावाचा  प्रारंभ बाजार समितचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Lasalgaon tomatoes rate (image google)

Lasalgaon tomatoes rate (image google)

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. आता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात हंगामातील टोमॅटो  लिलावाचा प्रारंभ बाजार समितचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी गोंदेगाव येथील शेतकरी जालिंदर खामकर यांचा टोमॅटो प्रतिक्रेट ५१०० रुपये दराने दोस्ती ट्रेडिंग कंपनी यांनी  खरेदी केला. यावेळी टोमॅटोस किमान १००० ते कमाल ५१०० तर सरासरी २६०० रुपये दर मिळाला. 

टोमॅटो शेतीमालास स्पर्धात्मक बाजारभाव मिळावा म्हणून टोमॅटो खरेदीदार, निर्यातदार व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्यावर  बाजार समितीचा भर राहणार आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांनो पीक विमा अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस, सेतू केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी..

लिलावानंतर शेतकऱ्यांना तातडीने रोख चुकवती केली जाणार आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी प्रारंभी सभापती क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, सदस्य छबुराव जाधव, राजेंद्र बोररगुडे, महेश पठाडे, रमेश पालवे, सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे, टोमॅटो व्यापारी बापू धरम, गणेश देशमुख उपस्थित होते.

 मोठी बातमी! शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील बीआरएसच्या पक्षात दाखल...

सध्या टोमॅटोला महिनाभरापासून दर टिकून आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता हे दर किती दिवस टिकून राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यात दोन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ७६ टक्के पाऊस, अजूनही काही तालुके पावसाच्या प्रतीक्षेत..
पीक विमा भरण्यासाठी महाराष्ट्राला केवळ 3 दिवसांची मुदतवाढ, इतर राज्यात 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

English Summary: In Lasalgaon, the price of tomatoes is Rs 5,100 per crate, the farmers are happy as the price of tomatoes has remained stable... Published on: 03 August 2023, 02:36 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters