रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ

Thursday, 04 October 2018 07:30 AM


नवी दिल्ली:
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीला चालना देण्याकरिता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री मंडळाच्या अर्थविषयक समितीच्या झालेल्या बैठकीत, 2018-19 या रब्बी हंगामातल्या सर्व रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला मंजुरी देण्यात आली.

याचे विपणन 2019-20 या हंगामात होणार आहे. शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या या पावलामुळे अधिसूचित पिकांच्या किमान आधारभूत किमतीत झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना 62,632 कोटी रूपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार असून उत्पादन खर्चाच्या वर किमान 50 टक्के परतावा मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट व्हायला मदत होणार आहे.

पिक

किमान आधारभूत किंमत 2017-18 (रुपये/ क्विंटल)

किमान आधारभूत किंमत 2018-19 (रुपये/ क्विंटल)

उत्पादन खर्च 2018-19 (रुपये/ क्विंटल)

किमान आधारभूत किमतीतील वाढ

गहू

1,735

1,840

866

105

बार्ली

1,410

1,440

860

30

हरभरा

4,400

4,620

2,637

220

मसूर

4,250

4,475

2,532

225

मोहरी

4,000

4,200

2,212

200

करडई

4,100

4,945

3,294

845


गहू किमान आधारभूत किमतीत प्रती क्विंटल 105 रुपये
, बार्ली प्रती क्विंटल 30 रुपये, मसूर प्रती क्विंटल 225 रुपये, हरभरा प्रती क्विंटल 220, मोहरी प्रती क्विंटल 200 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी यांची सरकारने निश्चित केलेली किमान आधारभूत किमत, उत्पादन खर्चाच्या पेक्षा खूपच जास्त आहे.

गव्हासाठी उत्पादन खर्च प्रती क्विंटल 866 रुपये आहे तर त्याची किमान आधारभूत किमत 1840 रुपये प्रती क्विंटल आहे. उत्पादन खर्चाच्या 112.5 टक्के परतावा शेतकऱ्याला मिळणार आहे. बार्ली साठी उत्पादन खर्च प्रती क्विंटल 860 रुपये आहे तर त्याची किमान आधारभूत किमत 1440 रुपये प्रती क्विंटल आहे. उत्पादन खर्चाच्या 67.4 टक्के परतावा शेतकऱ्याला मिळणार आहे. मसूरसाठी उत्पादन खर्च प्रती क्विंटल 2532 रुपये आहे तर त्याची किमान आधारभूत किमत 4475 रुपये प्रती क्विंटल आहे. उत्पादन खर्चाच्या 76.7 टक्के परतावा शेतकऱ्याला मिळणार आहे.

 

rabbi Minimum Support Price narendra modi MSP रब्बी किमान आधारभूत किंमत नरेंद्र मोदी wheat safflower gram barley masur mustard मोहरी हरभरा गहू बार्ली करडई मसूर

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.