गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही. भाजपने राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता घालवल्यानंतर आता पुणे जिल्ह्याला टार्गेट केले आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी आणि पवार कुटूंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
आता याच ठिकाणी सुरुंग लावण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. यामुळे याठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री करण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. यामुळे त्यांनाच पवारांच्या बालेकिल्ल्यात उतरवण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर देखील झेंडा रोवण्यासाठी फडणवीस यांना याठिकाणी पालकमंत्रीपद मिळू शकते. या निवडणूका देखील सध्या जवळ आल्या आहेत. यामुळे त्यांची निवड होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
खर की काय! गाई- म्हशींना मीठ दिल्यास वाढती दुधाची क्षमता? वाचा तज्ञांची प्रतिक्रिया
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला आहे. हे महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. पुण्यासह महाराष्ट्रासाठी पवार यांचे योगदान कोणीही कदापी विसरू शकणार नाही. यामुळे कोणी काहीही बोलले तरी काही फरक पडणार नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.
एक नंबर! अवघ्या २९९ रुपयांत तब्बल १० लाखांचा विमा, वाचा सविस्तर..
यामुळे पुणे जिल्ह्याचा कोणीही पालकमंत्री झाला, तरी काही फरक पडणार नाही, असे सुनील आण्णा शेळकेंनी सांगितले आहे. यामुळे आता पुण्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांनी नावे यामध्ये आघाडीवर आहेत.
महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! अनेक राजकीय घडामोडींनंतर दिनेश गुणवर्धने बनले श्रीलंकेचे पंतप्रधान
ब्रेकिंग! प्रसिध्द बांधकाम व्यावयसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर
दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा, एकमेकांवर बॉम्ब फेकले, राजकीय वातावरण तापले..
Share your comments