1. पशुधन

खर की काय! गाई- म्हशींना मीठ दिल्यास वाढती दुधाची क्षमता? वाचा तज्ञांची प्रतिक्रिया

शेतकऱ्यांचा हक्काचा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. यामधून अनेक शेतकरी चांगले पैसे कमवतात. अनेक शेतकरी हे जनावरांना कोणते खाद्य देयचे याबाबत संभ्रमात असतात. आता लोह, तांबे, जस्त, आयोडीन, मॅंगनीज, मॅग्नेशियम, सेलेनियम यासह सर्व पोषक तत्व मीठामध्ये (salt) आढळतात. हे सर्व घटक मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. यामुळे मीठ हे जनावरांना देखील फायदेशीर ठरते का असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकजण वैरणीमध्ये देखील मीठ टाकतात.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Milk capacity increases if cow-buffalo is given salt

Milk capacity increases if cow-buffalo is given salt

शेतकऱ्यांचा हक्काचा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. यामधून अनेक शेतकरी चांगले पैसे कमवतात. अनेक शेतकरी हे जनावरांना कोणते खाद्य देयचे याबाबत संभ्रमात असतात. आता लोह, तांबे, जस्त, आयोडीन, मॅंगनीज, मॅग्नेशियम, सेलेनियम यासह सर्व पोषक तत्व मीठामध्ये (salt) आढळतात. हे सर्व घटक मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. यामुळे मीठ हे जनावरांना देखील फायदेशीर ठरते का असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकजण वैरणीमध्ये देखील मीठ टाकतात.

मीठाची कमतरता प्राण्यांसाठी तसेच मानवांसाठी खूप घातक ठरू शकते. अनेक रोगांदरम्यान, डॉक्टर अनेकदा मीठ वापरण्याची शिफारस करतात. यामुळे ही बातमी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पशुपालक शेतकरी (cattle rearing farmers) असाल, तर मिठाचे सेवन प्राण्यांसाठी किती फायदेशीर आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. प्राणी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तुमच्या गायी आणि म्हशींचाही (cows and buffaloes) मीठा अभावी मृत्यू होऊ शकतो.

याबाबत माहिती अशी, मीठ खाल्ल्याने प्राणी निरोगी राहतात. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (Indian Veterinary Research Institute) बरेलीच्या पशु रोग संशोधन (Animal Disease Research) आणि निदान केंद्राचे सहसंचालक डॉ. के.पी. सिंग (Dr. K.P. Singh) म्हणाले की, दुधाळ जनावरांसाठी मिठाचा आहार अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे जनावरे चारा देखील पूर्ण खातात. यामुळे पचन देखील सुधारते.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निधी वितरीत, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

तसेच गायी आणि म्हशींना दूध देखील मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे मोठाचे प्रमाण वाढवून बघावे. मिठाचे द्रावण दिल्याने जनावरांची दूध उत्पादनाची क्षमता वाढते. याशिवाय दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात मीठाचे प्रमाण वाढवले ​​जाते. जर जनावरणांचे खाद्य साठवले तर त्यामध्ये मीठ टाकतात.

पावसाचा जोर ओसरला, आता नुकसानाच्या पंचनाम्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष

मिठाच्या कमतरतेमुळे जनावरांची भूकही मंदावते. म्हशींच्या आहारात मिठाचा अभाव असल्यास अनेक आजारांचा धोका असतो. अशा स्थितीत जनावरांना नियमानुसार दररोज मिठाचे द्रावण द्यावे. यामुळे मीठ हे फायदेशीर ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या;
अमित शहांच्या सहकार मंत्राल्यास शरद पवार करणार मार्गदर्शन, सरकार मंत्रालयाने केलेली विनंती
एफआरपीचे 31 हजार कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
देवेंद्र फडणवीस करणार परतफेड? अजितदादांसाठी 'ती' जागा सोडण्याची शक्यता..

English Summary: Really what! Milk capacity increases if cow-buffalo is given salt? Read expert feedback Published on: 21 July 2022, 03:45 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters