1. बातम्या

गोड ऊसाची कडू कहाणी: शेतकरी पती-पत्नीचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

मे महिना संपत आला तरी शेतकऱ्यांसमोर अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहेच.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
शेतकरी सुभाष सराटे आणि पत्नी मीरा यांचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

शेतकरी सुभाष सराटे आणि पत्नी मीरा यांचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

Jalna: मे महिना संपत आला तरी शेतकऱ्यांसमोर अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहेच. याबाबत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने चालू रहातील यांसारखे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणी यंत्र मराठवाड्यातदेखील दाखल करण्यात आले होते.

मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील साखर कारखाने सुरु आहेत मात्र ऊस तोडणीचे काम अद्यापही संपले नाही. साखर कारखाना तोडणी करायला तयार नसल्याने जालना येथील शेतकरी पती-पत्नीने अगदी टोकाचेच पाऊल उचलले. आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषारी द्रव्याचे सेवन करून पती-पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोदगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मोठ्या कष्टाने वाढवलेल्या उसाची तोडणी करण्यासाठी साखर कारखान्यांना विनवणी केली होती मात्र साखर कारखाना तोडणी करायला तयार नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. याआधीही अशा कितीतरी घटना घडल्या आहेत. कित्येकांनी तर ऊसच जाळून टाकला. यंदा या गोड उसाच्या कितीतरी कटू कहाण्या समोर आल्या आहेत.

मोदी सरकारचा हरभरा उत्पादकांना मोठा धक्का; खरेदीवर केली बंदी;अजित पवार आक्रमक

ऊस उत्पादक शेतकरी सुभाष सराटे यांनी जवळजवळ ८ एकरवर ऊसाची लागवड केली होती. शेतकरी सुभाष सराटे आणि पत्नी मीरा यांनी अमाप कष्ट केले, पिकाचे योग्य संगोपन केले. त्यामुळे आता कारखान्याला ऊस जाईल आणि आपल्याला आपल्या कष्टाचे पैसे मिळतील आशा आशेवर ते होते. परंतु, ऊस तोडणी करण्यासाठी कारखाना टोळीच पाठवत नसल्याने ते हताश झाले होते.

शेतकऱ्यांचा ऊस गेला वाळून आता तोडूनही होणार नाही उपयोग; अजूनही कारखाने सुरु

त्यांनी ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याकडे बऱ्याच वेळा विनवण्या केल्या. मात्र तरीदेखील ऊस तोड करायला कोणी तयार नसल्याने हतबल होऊन पती-पत्नीने आज थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आणि काही कळायच्या आतच त्यांनी किटकनाशकाची बाटली तोंडला लावत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेल्या पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना टळली.

त्यांच्या कडील कीटकनाशकाची बाटली पोलिसांनी हिसकावून घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला.अजूनही राज्यात 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप शिल्लक आहे. मध्यंतरी मराठवाड्यातील लातूर, परभणी, जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले होते त्यामुळे ऊसतोडणीची यंत्रे उसाच्या फडातही जाणे कठीण झाले होते.

ऊस तोडणीचे काम अद्यापही संपले नाही. कारखाने जवळ आहेत मात्र ऊसाला तोड नाही. यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. तसेच भारनियमनामुळे काही शेतकऱ्यांच्या उसाचे पीक हे शेतातच वाळत चालले असल्याचे चित्र समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या:
दीड कोटींचे बक्षीस,सगळ्यांना जेवण, बैलांची तपासणी; रंगणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत
महिला शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे? कृषिमंत्री दादा भुसे यांचे सूचक वक्तव्य

English Summary: Bitter story of sugarcane: Farmer husband and wife attempt suicide Published on: 27 May 2022, 02:58 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters