ऊसाचा रस आरोग्यदायी पेय

06 June 2020 10:11 PM By: KJ Maharashtra


ऊस हा देशातील सर्वात महत्वाचे कृषी-औद्योगिक पिके आहे तसेच आपल्या देशातील सर्वात महत्वाची नगदी पिकांपैकी एक आहे. देशात उत्पादित केल्या गेलेल्या सर्व गोड उत्पादनांसाठी ऊसापासून तयार केलेली साखर ही प्राथमिक कच्ची सामग्री आहे. ऊसाचा रस हा एक उच्च-उर्जा पेय आहे जे नैसर्गिक आणि शर्करायुक्त गोड निरोगी पेय आहे. भारत हा ऊस उत्पादनात जगातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक देश आहे. भारतातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडु आणि आंध्र प्रदेश हे पाच प्रमुख ऊस उत्पादक राज्य आहेत.

ऊसाचे पौष्टिक मूल्य:

 • कर्बोदके २७.५१ ग्रॅम.
 • प्रथिने ०.२७ ग्रॅम.
 • कॅल्शियम ११.२३ मि.ग्रॅ.
 • लोह ०.३७ मि.ग्रॅ.
 • पोटॅशियम ४१.९ मि.ग्रॅ.
 • सोडियम १७.० मि.ग्रॅ. ऊसाचा रसामध्ये आरोग्यास लाभदायक असे पोषक घटक आहेत जसे की, कर्बोदके, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर आवश्यक पोषक घटक. सदर पोषक घटक त्यास आदर्श ऊर्जा पेय बनवते. विशेषत: उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये, थंड असा ऊसाचा रस आपले आरोग्य निरोगी ठेवते आणि उर्जेची कमी होत असलेली पातळी त्वरीत सुधारते आणि शारीरिक थकवा कमी करते.   

ऊसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे        

 • ऊसाचा रस हा खोकला, दमा, मूत्ररोग आणि किडनी रोगावर अत्यंत गुणकारी आहे.       
 • त्वचा रोगावर उत्तम पर्याय म्हणुन ऊसाचा रस फायदेशीर ठरतो.
 • ऊसाचा रस कावीळ या रोगावर गुणकारी आहे.
 • कावीळ झाली असल्यास ऊस रोज सकाळी खाल्यास कावीळ बरा होण्यास मदत होते.      
 • उन्हाळ्यात डिहायड्रेशन ची भीती सतत असते, त्यामुळे ऊसाचा रस प्यायल्याने डिहायड्रेशन पासून बचाव होतो.        
 • ऊसाचा रस हा 'ऊर्जा ड्रिंक' म्हणून पण ओळखला जातो.
 • रसामध्ये ग्लुकोज ची मात्रा अधिक असते.       
 • आयुर्वेदाच्या अनुसार ऊसाचा रस यकृतला बळकटी आणण्यास मदत करतो.       
 • ऊसाचा रस घेतल्याने दातांना होणाऱ्या इन्फेकशन पासून बचाव होतो.        
 • ऊसाचा रसाचे सर्वात महत्वाचे आरोग्य फायदे म्हणजे मूत्रपिंड व मूत्रमार्ग संक्रमण, मूत्रपिंडांचे दगड आणि मूत्रपिंडाचे योग्य कार्य सुलभ करण्यास मदत करने.       
 • ऊसाचा रस खनिजामध्ये अत्यंत समृद्ध आहे.     
 • ऊसाचा रस एक पाचन टॉनिक म्हणून कार्य करते.       
 • ऊसाचा रस गर्भवती स्त्रीच्या आहारामध्ये रोज दिल्यास आरोग्यास फायदा होतो. ते जलद गर्भधारणा आणि सुरक्षित गर्भधारणा सुलभ करते.      
 • ऊसामध्ये साधे शुगर्स (सुक्रोज) असतात जे आपल्या शरीरात सहजपणे शोषले जातात. या शुगर्सचा वापर शरीरातील गमावलेला साखर स्तर पुन्हा भरण्यासाठी केला जातो.      
 • ऊस हे कॅल्शियमचे अत्यंत समृद्ध स्रोत आहे जे हाडे आणि दात बळकट करण्यास मदत करते.       
 • ऊसाचा रसमध्ये उपस्थित पोटॅशियम, आपल्या पोटाचे आम्ल पातळी संतुलित करण्यास मदत करते आणि पाचन रसांचे स्राव सुलभ करते.       
 • ऊसाचा रस हा कर्करोग, विशेषत: प्रोस्टेट आणि स्तनाचा कर्करोग यांसारख्या घातक रोगांमधे व्यापक प्रतिबंधक करू शकतो.        
 • ऊसाचा रस आपल्या शरीरात खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, जे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे.

लेखक:
शिंदे एकनाथ मुंजाजी
डॉ. अमोल पुरुषोत्तम खापरे
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ऊस ऊसाचा रस sugar sugarcane sugarcane juice साखर energy drink
English Summary: Sugarcane juice is a healthy drink

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.