महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी व शिक्षकांसाठी महत्वाची बातमी आहे.अत्याधुनिक शेतीकडे तरुणांचा कल वाढावा,तसेच भविष्यात नोकरी नाहीच मिळाली, तरी शेती व्यवसाय करण्यासाठी भावी पिढी निपुण व्हावी,यासाठी राज्य सरकारने आता शालेय विद्यार्थ्यांना पाचवीपासून ‘शेती’ विषयाचे धडे देण्याचे नियोजन केलं आहे.
याबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना लवकरच पाचवीपासून शेती (Agriculture) हा विषय शिकवला जाणार आहे.
हे ही वाचा -पावसात वाचवा पिके अशापद्धतीने, अवश्य वाचा
पाचवीपासून बारावीपर्यंत शेती विषय शिकवला जाईल. या निर्णयामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होतील व पर्यायाने शेतकऱ्यांच्या This decision will greatly improve the agriculture and in turn the farmers
आत्महत्या कमी होतील, असा दावा सत्तार यांनी केला.शालेय विद्यार्थ्यांना शेतीबाबत धडे गिरवण्यासाठी, प्रयोगशाळा म्हणून गावाेगाव असलेल्या सरकारी जागा दिल्या जातील. शेती विषय विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं शिकवता यावा, यासाठी शिक्षकांनाही याबाबत काही दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सत्तार यांनी दिली.
पिकांवर औषध फवारणी कशी करायची, सरी कशी टाकायची, पेरणी कशी करायची, गायी-म्हशींची निगा कशी राखायची, नवीन अवजारांचा वापर कसा करावा, खतांचा वापर कसा करायचा, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. मुलांना या गोष्टी लहानपणापासूनच शिकवल्या, तर भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.
सत्तार म्हणाले, की गावाकडची बहुतेक मुलं-मुली ही शेतकऱ्यांची असतात. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर सगळ्यांनाच नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे या मुलांना त्यांचा वडिलोपार्जित शेती धंदा समजावा, यासाठी पाचवीपासून शेती विषय शिकवला जाणार आहे.
शेती विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी कृषी व शिक्षण विभागातील प्रत्येकी दोन, अशा चार लोकांची समिती स्थापन केली जाईल. ही समिती शेती विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम करील. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनाही सारी माहिती देऊ. तसेच, शिक्षणमंत्र्यांसोबतही चर्चा करणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले..
Share your comments