1. कृषीपीडिया

पावसात वाचवा पिके अशापद्धतीने, अवश्य वाचा

सततचा पाऊस व अचानक पडणारे तीव्र ऊन यामुळे जमिनीला वाफसा येत नाही.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पावसात वाचवा पिके अशापद्धतीने, अवश्य वाचा

पावसात वाचवा पिके अशापद्धतीने, अवश्य वाचा

सततचा पाऊस व अचानक पडणारे तीव्र ऊन यामुळे जमिनीला वाफसा येत नाही. तीव्र उन्हामुळे माती तापून उष्ण वाफ बाहेर पडते. या वाफेचा आघात प्रथम मुळांवर होतो व नंतर पानावर व फळांवर होतो. मुळे कोमजून मातीतून अन्नद्रव्यांची उचल खंडित होते व पानांवर विविध प्रकारच्या विकृती दिसू लागतात. परिणामी फुलगळ व लागलेली फळे विकृत होऊन गळून पडतात.     

असे घडत असताना उत्पादक अभ्यास न करता फवारणी किंवा खते देत असतात. When this happens, growers spray or apply fertilizers without studying.  यामुळे देखील उत्पादनात घट होत असते. मी शेतकरी बांधवांना यावर काही उपाय सुचवतो त्यांचा नक्की फायदा होईल.

हे ही वाचा - मिरची वरील डायबँक आणि फळ सडणे आणि उपाय

पीक कुठलेही असो उपाय समानउपाययोजना - 1)बुरशीनाशकांची फवारणी ph काढून सकाळी करावी.2)कीटकनाशकांची फवारणी ph काढून सायंकाळी करावी.

3)जास्त औषधे एकत्र करून नये.4)उच्च गुणवत्तेचे व्हर्मीवॉश ( गांडूळ पाणी) व काळा गुळ फवारल्यास पानांना मुख्य व दुय्यम अन्नद्रव्य उपलब्ध होऊन पानांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून फुलगळ थांबते.(व्हर्मीवॉशमधील लिग्निन पिकास उपलब्ध झाल्याने अनेक फायदे दिसून येतात.)5) एकापेक्षा जास्त औषध एकत्र करताने कोणते औषध पाण्यात पहिले टाकावे व कोणते दुसरे हे माहीत असणे गरजेचे.

6)पावसाळ्यात जीवामृत देणे हिताचे ठरते.जीवामृतचे कार्य: आपण जेवण केल्यावर जेवण पचवण्याचे काम लाळग्रंथी करत असते. तसे शेतातील रासायनिक खतांना पचवण्याचे व रासायनिक खतांचे अल्पकालावधीत विघटन करून जैविक अन्नसाठा उपलब्ध करून देण्याचे काम जीवामृत करत असते. यामुळे खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते.

7)बऱ्याच वेळी पावसाच्या कालावधीत रासायनिक औषधांच्या फवारण्या घेणे शक्य होत नाही.यावेळी जैविक बुरशीनाशकांची फवारणी उपयुक्त ठरते.उदा: ट्रायकोडर्मा8)मातीला वाफसा येण्यासाठी मोठ्याप्रमाणात फॉस्फरिक ऍसिडचा वापर केला जातो.प्रथम जमिनीतून देण्यासाठी कोणते फॉस्फरिक ऍसिड वापरावे हे समजूनच वापरावे. शक्यतो देणे टाळावे.

 

दत्तात्रय ढिकले

अध्यक्ष-AORF INDIA

Mo 9922381436

Web: www.deepjyoti.in.net

English Summary: How to save crops in rains, must read Published on: 18 September 2022, 09:35 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters