गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत. सध्या कांद्याचे दर पडले असून वाहतूक देखील परवडत नाही. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी कांदा परिषद आयोजित केली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली.
सदाभाऊ खोत म्हणाले, कांदा उत्पादकाला योग्य दर मिळवून देणे ही राज्य व केंद्र सरकार या दोघांचीही जबाबदारी आहे. दुर्दैवाने सरकारकडून ही जबाबदारी पार पाडली जात नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, तसेच अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. ऊस उत्पादक शेतकर्यांप्रमाणे कांदा उत्पादकांना राजाश्रय मिळालेला नाही.
यामुळे आजपर्यंत कांदादराबाबत योग्य असे धोरण ठरू शकलेले नाही. खरेतर कांदा न खाल्ल्याने कोणी मेले आहे का? आजपर्यंत तरी मी ऐकलेले नाही, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी अजूनच आक्रमक होण्याची शक्यता आहे. कधी कांदा रडवतोय, तर कधी हसवतोय. कांदा उत्पादक शेतकर्यांपुढे कधी निर्यातबंदी, तर कधी नैसर्गिक संकट उभे राहिल्याने, शेतकरी अडचणीत आला आहे.
पुणतांब्यानंतर शेतकरी आंदोलन राज्यभर पसरले, आता क्रांती होणारच...
शेतकऱ्यांसाठी कांदा परिषदेच्या माध्यमातून एक धोरण ठरवून ते राज्य आणि केंद्र सरकारकडे देणार आहे. या धोरणावर विचार नाही झाला, तर मग आरपारची लढाई लढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंमधून कांदा वगळावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी राज्य सरकारने केंद्राकडे मांडावी, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.
ऊसाचे बिल मागायला गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण, घटनेने राज्यात खळबळ
राज्य सरकार फक्त लोणी खाण्यात व्यस्त आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. यामुळे आता येणाऱ्या काळात हा प्रश्न चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा फेकून दिला आहे. तर काहींनी कांद्यामध्ये जनावरे सोडून दिला आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा खर्च देखील मिळाला नाही.
महत्वाच्या बातम्या;
आधी अण्णा हजारेंकडे 6 हजाराने कामाला, पट्ठ्या आज शेतीतुन कमवतोय वार्षिक 6 कोटी रुपये, वाचा नेमकं काय केलं
दुकानदाराने खते दिली नाहीत तर मोबाईवर चेक करा खतसाठा, खत विक्रेत्यांच्या मनमानीला लगाम
चंद्रपुरात अख्खं मार्केट आपलय..! शेतकऱ्यांची मॉलमधून शेतीमालाची विक्री, शेतकरीच झाले व्यापारी
Share your comments