1. बातम्या

20 हजार रुपये तोळे सोने 50 हजार रुपये एवढे झाले तरी लोक घेतात ना? सदाभाऊ खोत यांनी उलट सवाल करत केले महागाईचे समर्थन

सध्या सगळ्याच गोष्टींमध्ये महागाई वाढली आहे. खाद्यतेल असो की पेट्रोल,डिझेल, सीएनजी गॅस, स्वयंपाकाचा गॅस अशा बऱ्याच गोष्टींमध्ये महागाईचा भस्मासूर डोके वर काढूनउभा आहे

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
bjp mla sadabhau khot give opinion on inflation in country at chalisgaon

bjp mla sadabhau khot give opinion on inflation in country at chalisgaon

 सध्या सगळ्याच गोष्टींमध्ये महागाई वाढली आहे. खाद्यतेल असो की पेट्रोल,डिझेल, सीएनजी गॅस, स्वयंपाकाचा गॅस अशा बऱ्याच गोष्टींमध्ये महागाईचा  भस्मासूर डोके वर काढूनउभा आहे

या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. खाद्यतेल घ्यायचे ठरले म्हणजे एका किलोसाठी 175 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत. खाद्यतेलाचा हा भाव पाहिला म्हणजे गरीब जनता कसं काय तेल खरेदी करू शकेल हा मोठा प्रश्न पडतो. अशा या सगळ्या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे. परंतु दुसरीकडे भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी उघडपणे महागाईचे समर्थन केले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती अशी की, सध्या कोकण पासून निघालेली जागर शेतकऱ्याचा आक्रोश महाराष्ट्राचा हा संवाद आज जळगाव जिल्ह्यात आला असताना सदाभाऊ खोत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या संवादाच्या वेळी त्यांनी आघाडी सरकारच्या धोरणांसह पवार कुटुंबावर टीका करतानाच पत्रकार परिषदेमध्ये चक्क महागाईचे समर्थन केले.

यावेळी पत्रकारांना प्रश्न विचारला असता सदाभाऊ खोत म्हणाले की, कोण धाडस करेल, कुठला पक्ष महागाईचे समर्थनाचे धाडस करेल  रुपये तोळे झाले तरी लोक घेतात ना? पण मी धाडस केलं, कशाची महागाई हो, वीस हजाराची सोने 50 हजार तेव्हा महागाई  दिसत नाही, देशी कॉटर आता  दीडशे ते दोनशे रुपये मिळायला लागली आहे मग महागाई नाही वाढली का? दारू महाग झाली म्हणून लोकांनी दारू पिण सोडलं का? तसे या महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावा त्यांनी केला. सोयाबीनचा भाव आणि तेलाचा भाव वाढला त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात पैसा येईल, त्यामुळे मजुरांची मजुरी वाढेल, गरिबाला तेल खायला परवडत नाही त्यांची ही मजुरी वाढुन जाईल. असा देखील सदाभाऊ खोत म्हणाले. गव्हाचे पीठ महागले की जीवनावश्यक वस्तू झाली, ज्यांना ज्यांना जीवनावश्यक वस्तू म्हणून फुकट खायची असेलत्यांनी दोन एकर शेती घ्यावी, आम्ही फुकट देणार नाही.

तुम्ही 150 रुपयांची कॉटर घेऊ शकता मग आमच्या गाईचे दूध शंभर रुपये का पिऊ शकत नाही.80 टक्के लोक दारू पितात, पैसा वाले सगळे दारू पितात असा दावाही त्यांनी केला.(स्रोत-News18लोकमत)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:दीड एकरात फुलवला सूर्यफूलचा मळा आणि एकाच वर्षात बनला लखपती; वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

नक्की वाचा:कामाची बातमी : सरकार देतंय खतांच्या खरेदीसाठी 11 हजारांचे अनुदान, आजच घ्या लाभ

नक्की वाचा:शेतातील दगड गोट्याचे टेंशन विसरा; आली 'ही' मशीन, दोन तासात बाजूला करता येणार दगड गोटे

English Summary: bjp mla sadabhau khot give opinion on inflation in country at chalisgaon Published on: 09 May 2022, 08:43 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters