काजू बोडांची बाजारपेठ ही सहाशे कोटी रुपयांची आहे ती वाढावी म्हणून मंत्रीमंडळाने काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू आता विदेशी दारूच्या दुकानात विकण्याचा निर्णय घेतला आहे. काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणाऱ्या दारूला देशी दारूचा दर्जा देण्यात आला होता.
मात्र देशी दुकानात दारूची विक्री होत नसल्याने अनेक उत्पादकांच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. तक्रारींची दखल घेत सरकारने काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू आता विदेशी दारूच्या दुकानात विण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. काजू बोडांची बाजारपेठ ही सहाशे कोटी रुपयांची आहे ती वाढायला मदत हेईल असा राज्य सरकारचा उद्देश असून त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते.
दारूची विक्री करणाऱ्या दुकानांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली. इलाईट आणि सुपर प्रिमियम असे दोन गट तयार केले आहेत, सरकारच्या या निर्णयामुळे दारूची छोटी दुकाने आता 600 चौरस फुटांपर्यंत आपली कक्षा वाढवू शकतात.
तर सुपर प्रिमियम 600 चौरस फुटांच्या वरती वाढवता येणार आहे.
महसूल वाढवण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाला मद्यविक्रीतून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होते, महसूल वाढीसाठी एफएल-2 परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास सरकारने या शासन निर्णयातून मान्यता दिली आहे.
काजूबोंडे, मोहाच्या फुलांपासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण आखले असल्याचे शासनाचे मत असून यामुळे दारू उत्पादकांना फायदा होईल असा शासनाचा मानस आहे.
महत्वाच्या बातम्या
अवकाळी पावसाचा धुमाकूळ; वीज कोसळून तीन गायींचा बळी
माळवाडीच्या शेतकऱ्याची परदेशी पाहुण्याला भुरळ, शेती बघण्यासाठी परदेशी पाहुणे माळवाडीच्या शिवारात
Share your comments