1. बातम्या

आता ना गावठी ना देशी, आता फुलांपासून थेट विदेशी, राज्य सरकारचा निर्णय..

विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांसह धुळे आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुले उपलब्ध होतात. तब्बल एक ते सव्वा लाख मेट्रिक टन मोहफुले गोळा केली जातात. जंगलातून आणलेली मोहफुले वाळवून साठवून ठेवली जातात.एक कुटुंब यातून एका हंगामात १० ते १२ हजार रुपये कमावते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
flowers wine state goverment

flowers wine state goverment

राज्यात अनेक ठिकाणी मोहफुले उपलब्ध आहेत. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांसह धुळे आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुले उपलब्ध होतात. तब्बल एक ते सव्वा लाख मेट्रिक टन मोहफुले गोळा केली जातात. जंगलातून आणलेली मोहफुले वाळवून साठवून ठेवली जातात.एक कुटुंब यातून एका हंगामात १० ते १२ हजार रुपये कमावते. आता याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत मोहफुलांचा जास्तीत जास्त वापर हातभट्टीची गावठी दारू बनविण्यासाठीच केला जातो.असे असताना या गावठी दारूचे आकर्षण विदेशी दारू पिणाऱ्यांनाही असते. आतापर्यंत मोहफुलांपासून देशी दारूसुद्धा बनविण्याची परवानगी नव्हती. आता मात्र राज्य मंत्रिमंडळाने मोहफुलांपासून थेट 'विदेशी' दारू बनविण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे आता आदिवासी कुटुंबांचे अर्थचक्र बदलण्याची शक्यता आहे. या मोहफुलांपासून विदेशी दारूची निर्मिती सुरू झाल्यास मोहफुलांचे सध्याचे दर दुप्पट, तिप्पट वाढून आदिवासी कुटुंबाला याचा फायदा होणार आहे. यामुळे आता याकडे आदीवासी बांधवांचे लक्ष लागले आहे. २०१७ मध्ये मोहफुलांना बंधनमुक्त करण्यात आले. त्यानुसार मोहफुलांची खरेदी, गोळा करणे आणि वाहतूक यावरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.

जंगलातून मोहफुले गोळा करून आणून ती वाळवून अधिकृतपणे विक्री करण्याचा निर्णय गेल्यावर्षीच झाला आहे. हा परवाना केवळ आदिवासी सदस्य असलेल्या आदिवासी विकास संस्था, बचत गट, सहकारी संस्था किंवा ग्रामपंचायत अशा मान्यताप्राप्त संस्थांनाच मंजूर केला जाणार आहे. यामुळे फायदा होण्याची शक्यता आहे.

यामुळे आता गडचिरोली येथील मोहफुलांना मात्र चांगला भाव मिळणार आहे.तसेच मोहफुलांपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनविले जातात. आता यामुळे आदिवासी लोकांना चार पैसे मिळणार आहेत. आता याबाबत पुढे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकार यासाठी आग्रही आहे.

महत्वाच्या बातम्या;
लोडशेडिंगबाबत अजित पवारांची मोठी घोषणा! लोडशेडिंगवर तोडगा निघण्याची शक्यता...
शेतकऱ्यांनो शेतीसोबत करा 'हे' व्यवसाय, मिळेल लाखोंमध्ये नफा..
लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा, कोणत्या भागात किती तासांचे भारनियमन, जाणून घ्या...

English Summary: Now neither village nor native, now foreign directly from flowers, the decision of the state government .. Published on: 22 April 2022, 04:43 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters