नाशिकच्या निफाड तालुक्यातील रुई गावात येत्या 5 जूनला कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कित्येक कांदा उत्पादकांनी कांदा फुकटात वाटून टाकला तर कोणी जाळून टाकला. काही शेतकरी तर जनावरांना कांदा खाऊ घालत आहेत. कांद्याचे दर घसरल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले.
राज्य सरकारपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश पोहचवण्यासाठी रयत क्रांती संघटना सज्ज झाली असून या संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी कांदा परिषद आयोजनाची माहिती दिली आहे. येत्या 5 जून 2022 ला नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील रुई गावात भव्य कांदा परिषद आयोजित करण्यात येणार आहे.
1982 साली भरली होती पहिली कांदा परिषद
शरद जोशी यांनी निफाड तालुक्यातील रुई या गावात पहिली कांदा परिषद भरवली होती. आता 1982 नंतर म्हणजेच तब्बल 39 वर्षानंतर पुन्हा एकदा याच ठिकाणी कांदा परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र म्हणून निफाड ला ओळखले जाते. यावेळी देखील या परिषदेच्या माध्यमातून सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा आक्रोश पोहचावा, कांद्याबाबतीत शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या यातून केल्या जाणार आहेत.
मोठी बातमी! कोरोना रुग्ण वाढत चालल्याने मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
राज्यात गेल्या काही दिवसापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे कांद्याला अनुदान मिळावे, हमीभाव मिळावा, नाफेडकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याला दर वाढवून मिळावा या सगळ्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. रयत क्रांती संघेटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्यासह भाजप नेते प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर आदींची उपस्थित राहणार आहे.
आशिया खंडातील मोठी कांदा बाजारपेठ
नाशिक,पुणे, आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगावचे नाव समोर येते. त्यामुळे 05 जूनला भरणाऱ्या परिषदेमध्ये काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
सरकार डोळेझाक करत असेल तर आम्ही आवाज उठवू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोडंस गावाकडं बघावं, शेतकऱ्यांकडे बघावं, त्यांना वेळ नसेल तर त्यांनी ऑनलाईन कांदा उत्पादकांसाठी एखादी बैठक घ्यावी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी. आणि जर सरकार या सगळ्या गोष्टींकडे डोळेझाक करत असेल तर आम्ही याविरोधात आवाज उठवू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या:
पीक कर्जाबाबत जिल्हा प्रशासानाचा पुढाकार; 15 दिवसांमध्ये वाढणार पीककर्जाचा आकडा
Breaking: भारताच्या गव्हात आढळला व्हायरस; 'या' देशाने परत केला भारतीय गहू
Share your comments