1. बातम्या

सांगा शेती करायची कशी? कांद्याला कवडीमोल दर; शेतकऱ्याने फिरवला कांद्यावर नांगर

मित्रांनो भारतात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन आपल्या राज्यात घेतली जाते. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात, खांदेशात विदर्भात मराठवाड्यात तसेच कोकणातही कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला तर कांद्याचे आगार म्हणून संपूर्ण जगात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र आता याच महाराष्ट्रात कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्याला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Onion Crop

Onion Crop

मित्रांनो भारतात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन आपल्या राज्यात घेतली जाते. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात, खांदेशात विदर्भात मराठवाड्यात तसेच कोकणातही कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला तर कांद्याचे आगार म्हणून संपूर्ण जगात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र आता याच महाराष्ट्रात कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्याला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

मित्रांनो खरे पाहता दोन महिन्यांपूर्वी कांद्याला 3500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत होता. त्यावेळी मिळत असलेल्या दरात कांदा उत्पादक शेतकरी समाधानी देखील होता. मात्र अवघ्या दोन महिन्यात कांद्याचे दर कमालीचे कोसळल्याचे बघायला मिळत आहेत. सध्या आपल्या राज्यात कांद्याला अतिशय नीचांकी दर मिळत आहे. कांद्याला सध्या महाराष्ट्रात शंभर ते दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा नीचांकी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून कांदा पुन्हा एकदा बेभरवशाचा ठरला आहे.

 

एवढ्या कमी दरात कांदा विकण्यापेक्षा फुकटात वाटप करण्याला शेतकरी पसंती देत ​​असल्याची राज्यातील परिस्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून कांदा लागवडीसाठी आवश्यक उत्पादनखर्च दुप्पट वाढला आहे आणि त्यांना सध्या 100 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. सध्या मिळतं असलेल्या कवडीमोल दरापेक्षा शेतातून शेतमाल बाजारात नेण्यासाठीचा खर्च हा जास्त येत आहे.

एवढा कमी भाव पाहून आता कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे पीक नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय देखील दिसत नाहीये. जळगाव जिल्ह्यात सध्या मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशा मेटाकुटीला आला असून आता येथील शेतकरी कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवताना बघायला मिळत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी विष्णू इंगळे यांनी देखील त्यांच्या 4 एकर जमिनीत कांद्याची लागवड केली होती. कांद्याला चांगला भाव मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र सध्या 100 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकला जात आहे, हे पाहून त्यांची पायाखालची जमिनच सरकली आहे. यामुळे या शेतकऱ्याने शेतात ट्रॅक्टर चालवून 4 एकरात तयार झालेले कांद्याचे पीक नष्ट केले.

ऐकावे ते नवलंच! मॅकडोनाल्डमध्ये जेवणासाठी 'ही' कंपनी देणार तब्बल 1 लाख रुपये पगार; वाचा काय आहे 'हा' माजरा

उत्पादन खर्च देखील निघेना 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, कांदा पीक काढणी, वर्गीकरण, वाहतूक यांवर इतका खर्च येतो की तो खर्चही सध्या मिळत असलेल्या कवडीमोल दरात काढणे अशक्य आहे. शेतकरी विष्णू इंगळे यांनी सांगितले की, कांद्याला अतिशय नगण्य दर मिळत असल्याने त्यांना कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची नामुष्की ओढावली आहे. विष्णू इंगळे यांच्या मते, ट्रॅक्टर फिरवल्याने निदान खरीप हंगामातील दुसरे पीक घेण्यासाठी शेत तरी साफ होईल.

LPG Price : घरगुती एलपीजी गॅस पुन्हा महागला; सर्वसामान्यांचे बजट पुन्हा कोलमडलं

4 एकरात कांद्याची लागवड करण्यासाठी विष्णू यांना सुमारे 2 लाखांहून अधिकचा खर्च आला आहे. मात्र आता कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने हा लाखों रुपयांचा खर्च काढायचा कसा हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. निश्चितच अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक स्वतःच्या हाताने नष्ट करण्याची वेळ कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांवर ओढावली आहे. हे निश्चितच एक चिंताजनक आणि विश्लेषणात्मक आहे.

बातमी कामाची! शेतकरी मित्रांनो 'या' पिकांची शेती करा आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा

English Summary: Tell me how to farm? Kwadimol rates for onions; The farmer turned the plow on the onion Published on: 23 May 2022, 12:16 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters