गेल्या काही दिवसांपासून साखर कारखाने आणि साखर उद्योग अडचणीत आले आहेत. यामुळे कारखाने चालवणे देखील अवघड झाले आहे. यातच साखर आयात निर्यात धोरण अनेकदा बदलत आहे. यामुळे नुकसान होत आहे. गेल्या तीन वर्षांत साखर निर्यात (Sugar Export) वाढली आहे. या निर्यातीत सहकारी साखर कारखान्यांचा (Sugar Mill) वाटा ४१ टक्के आहे. हा आकडा वाढला आहे.
असे असताना निर्यातीचा फायदा सहकारी साखर कारखान्यांना होणार असल्याने केंद्राने जास्तीत जास्त सहकारी कारखान्यांना निर्यातीची परवानगी (Export Permission) द्यावी, अशी मागणी साखर उद्योगातून (Sugar Industry) होत आहे. ययामुळे पुढील काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तीन वर्षांपासूनच्या काळात (साखर वर्ष २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ प्रगतिपथावर) भारताने विक्रमी २२२ लाख टन साखरेची निर्यात केली आहे.
निर्यातीत सहकारी साखर कारखान्यांचा वाटा ४१ टक्के इतका मोठा आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सहकारी साखर कारखाने यामध्ये आघाडीवर आहेत. यामध्ये एकूण २२२ लाख टनांपैकी १०८ लाख टन साखर कच्ची आहे. ११४ लाख टन पांढरी (रिफाइंड) साखर आहे. इंडोनेशिया, बांगलादेश आणि इतर आफ्रिकन आणि मध्य पूर्व देश ही भारतातील साखरनिर्यात केलेली प्रमुख ठिकाणे आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर साखर जाते.
माळेगाव साखर कारखाना राज्यात सर्वात हायटेक, तोडणीपासून ते गाळपापर्यंत सगळंच स्मार्ट...
तसेच या निर्यातींनी ६० हजार ८०० कोटींचा महसूल मिळवला आहे. त्याचबरोबर कोरोना बिकट आर्थिक परिस्थिती आणि साखरेचा कमी झालेला घरगुती वापर यांसारख्या सर्व अडचणी असूनही सहकारी साखर क्षेत्राने उसाची संपूर्ण थकबाकी भरलेल्या कारखान्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. यामुळे ही एक दिलासादायक बाब आहे.
काय सांगता! खरिपाच्या तोंडावर खतांच्या पोत्याला फुलांचा हार, वाचा नेमकं काय आहे कारण..
तसेच देशात उसाची थकबाकी १८ हजार कोटींच्या आसपास आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमधील सहकारी कारखान्यांची थकबाकी कमी आहे. सध्या साखर कारखान्यांपुढे अनेक आव्हाने आहेत. यामुळे अनेक कारखाने बंद देखील पडले आहेत. या कारखान्यांचे करायचे तरी काय असा प्रश्न अनेकांपुढे आहे.
महत्वाच्या बातम्या;
दोन वर्षानंतर टोमॅटोने मालामाल केल्याने शेतकऱ्याने टोमॅटोच्या रोपाची काढली मिरवणूक
पेट्रोल, डिझेल होणार २० रुपयांनी स्वस्त, मोदी सरकारकडून दिलासा मिळणार
'भीक मागून कृषिमंत्र्यांना पैसे देऊ पण कांद्याला रास्तच भाव घेऊ'
Share your comments