भारत सरकार फलोत्पादनात उच्चांकी भरारी घेण्यासाठी प्रयत्नशील असून इस्रायल सोबत काम करत आहे. या माध्यमातून भारतात इस्रायली तंत्रज्ञान सह भाजीपाला आणि फळे केंद्रे स्थापन करण्यात येत असून इंडो इस्रायल कृषी प्रकल्पांतर्गत ही केंद्र बांधली जात आहेत.
केंद्र सरकारने आतापर्यंत देशात छत्तीस भाजीपाला आणि फळे केंद्रांना मान्यता दिली असून त्यापैकी 29 भाजीपाला आणि फळे केंद्रित देशभरात कार्यरत असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे कमी खर्चात उत्पादन करण्याच्या तंत्राची माहिती देत आहेत.
अजून उरलेल्या आठ नवीन भाजीपाला आणि फळे केंद्र स्थापन केली जाणार आहेत. ज्याची सुरुवात वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहे. यासंबंधीची माहिती कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. अभीलाक्ष लेखी यांनी.
बारा राज्यांमध्ये 29 केंद्र कार्यरत
इंडो इस्राईल कृषी प्रकल्पांतर्गत देशांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या या उत्कृष्ट केंद्रांचा कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून आढावा घेण्यात आला. त्याअंतर्गत विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. अभीलाक्ष लेखी यांनी तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील रेडडीयारचाथरम गावात स्थापन करण्यात आलेल्या वेजिटेबल एक्सलन्स सेंटरची पाहणी केली.
या वेळी त्यांनी माहिती दिली की देशात आतापर्यंत एकूण 37 सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान, कर्नाटक, बिहार, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि मिझोराम या राज्यांमध्ये 29 केंद्र कार्यरत असून जे फलोत्पादन पिकांवर लक्ष केंद्रित करीत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
बागायती पिकांच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक
बागायती पिकांकडे भारताचा कल गेल्या काही दशकांमध्ये वाढला असून जागतिक स्तरावर भारताने फलोत्पादनात कौशल्य आणि प्राविण्य मिळवले आहे. परिणामी भारता बागायती पिकांच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असून एका आकडेवारीनुसार जगात उत्पादित होणाऱ्या एकूण फळे आणि भाजीपाला पैकी 12 टक्के उत्पादन भारतात होते.
त्याच वेळी 2019-20 मध्य भारताने भागातील पिकांच्या उत्पादनात विक्रम केला होता.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:फलोत्पादन विशेष: शहाबादी आंब्याला विदेशी पसंत,आमिर खानची आहे 200 बिघा आंब्याची बाग
Share your comments