कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion grower farmers) ही महत्त्वाची बातमी आहे. आपण पाहिले ते मागच्या काही दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर बाजार समित्यांपेक्षा कांद्याला चांगला भाव मिळत आहे.
27 ऑगस्टचे कांदा बाजारभाव
काल दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा (Onion Market Price) बाजारभावानुसार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक 2100 रुपयांचा भाव मिळाला आहे.
पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याबद्दल कृषी मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले हप्ता...
जवळपास काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) 8 हजार 824 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. यासाठी किमान भाव 100 कमाल भाव 2100आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये इतका मिळाला आहे.
Astro tips: 'या' गोष्टींच्या पालनाने नशीब चमकते; पैशांची कमी राहत नाही
25 ऑगस्टचे बाजारभाव
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 25 रोजी कांद्याचे भाव गडगडलेले दिसले. कांद्याला कमाल 1900 रुपये भाव मिळाला होता.
दिनांक 26 रोजी कांद्याला 2 हजार रुपयांचा कमाल भाव मिळाला होता. तर काल 27 ऑगस्ट रोजी कांद्याला कमाल 2100 चा भाव मिळालेला आहे. याच्या तुलनेत कांदा बाजारभावात चढ दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
Agriculture Scheme: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना करावे लागणार 'हे' एक काम
Incentive Grant: आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपर्यंत जमा होणार 50 हजार रुपये
भारीच की! आता शेतकरी घरबसल्या विकू शकणार आपला शेतीमाल; अशी आहे प्रक्रिया
Share your comments