1. फलोत्पादन

जाणून घेणे महत्त्वाचे! 'या'पद्धती ठरतात सेंद्रिय शेती साठी उपयोगी

सध्या बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत असून सेंद्रिय उत्पादनांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. एक शाश्वत शेतीची पद्धत असून ही पूर्णतः नैसर्गिक अफवांवर अवलंबून आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this method is useful and more profitable for organic farming

this method is useful and more profitable for organic farming

 सध्या बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत असून सेंद्रिय उत्पादनांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. एक शाश्वत शेतीची पद्धत असून ही पूर्णतः नैसर्गिक अफवांवर अवलंबून आहे.

आपल्याला माहित आहे की या शेतीपद्धतीत महागड्या व घातक रासायनिक खतांचा वापर टाळून  नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण व मानवी आरोग्य सुरक्षितता यासाठी दीर्घकालीन नियोजनाचा समावेश केला जातो. या शेतीपद्धतीत शेतावर उपलब्ध असलेल्या साधनांचा कार्यक्षम वापर करणे अपेक्षित असते. या लेखामध्ये आपण सेंद्रिय शेतीच्या पद्धती जाणून घेणार आहोत.

 सेंद्रिय शेतीच्या पद्धती

1- सिंचनाच्या सुविधा वाढवून पाण्याचे प्रदूषण टाळावे.

2-पीक पद्धतीमध्ये पिकांची फेरपालट करून द्विदल पिकांचा समावेश करावा.

3- मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.

4-पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा साठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते, गांडूळ खते, अखाद्य पेंड, मासळीची खते, जनावरांची उत्पादने आणि जिवाणूसंवर्धक यांचा वापर करावा.

5- सतत ओलावा व सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होत असणाऱ्या नारळी, पोफळी व मसाला पिकांच्या बागांमध्ये गांडूळ शेतीचा अवलंब करावा.

6- अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी ताग, धैचा, गवार, मुग, चवळी,उडीद, शेवरी, गिरीपुष्प, सुबाभूळ यासारख्या हिरवळीच्या खतांचा वापर करावा.

 सेंद्रिय शेतीमध्ये रोगनिवारणासाठी या पद्धती वापराव्या

1- रोगप्रतिकारक वानांची किंवा जातींची लागवड करावी.

2- मशागतीच्या पद्धतीमध्ये बदल करून उदाहरणार्थ भुईमूग पेरणी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान केल्यास शेंडेमर रोग टाळता येतो.

3- कीटकनाशकांचा वापर करताना उदा. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी टोमॅटो, भेंडी, भुईमूग खत पिकांना ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.

 किड निवारण्यासाठी जैविक पद्धती

1- भक्षक व परजीवी किडींचा वापर - उदाहरणार्थ भात पिकासाठी ट्रायकोग्रामा ची अंडी असलेल्या कार्ड चा वापर करावा. माव्याचा उपद्रव कमी करण्यासाठी लेडी बर्ड बीटल या परोपजीवी किडीचा वापर करावा.

2- कीटक प्रलोभकांचा वापर-फळबागांमध्ये फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी चार ते पाच रक्षक सापळे लावावेत.

3- किडनाशक वनस्पती पासून बनवलेल्या विषारी द्रव्यांचा वापर करावा. उदाहरणार्थ कडुलिंब, करंज, धोतरा इत्यादी

4- कृषी - वन - उद्यान - कुरण पद्धतीचा अवलंब करावा. वन झाडांच्या लागवडीमध्ये शिवन, किंजळ, साग, सुबाभूळ, बांबू, कडूलिंब, बोर, आवळा इत्यादी वन झाडांचा समावेश करावा.

5- फळे व भाजीपाला साठवण्यासाठी घातक रसायनांचा वापर न करता सुरक्षित पद्धतीचा वापर करावा. उदा. गरम वाफेची प्रक्रिया, पूर्वशीतकरण, सिद्ध कक्षाचा वापर इत्यादी

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:. तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल! नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो पिटाया फळाची लागवड ठरतीये फायदेशीर, अनेकांनी केली लाखोंमध्ये कमाई..

नक्की वाचा:क्रिकेटनंतर कडकनाथ! धोनीचे पोल्ट्री व्यवसायात पदार्पण, जाणून घेऊ कडकनाथ कोंबडीचे वैशिष्ट्ये

English Summary: this method is useful and more profitable for organic farming Published on: 26 April 2022, 04:06 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters