1. पशुधन

क्रिकेटनंतर कडकनाथ! धोनीचे पोल्ट्री व्यवसायात पदार्पण, जाणून घेऊ कडकनाथ कोंबडीचे वैशिष्ट्ये

एम एस धोनी क्रिकेटचे मैदान गाजवणारा एक भारतीय दिग्गज क्रिकेट खेळाडू ही धोनीची ओळख आख्या जगाला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
image courtesy-times of india

image courtesy-times of india

 एम एस धोनी क्रिकेटचे मैदान गाजवणारा एक भारतीय दिग्गज क्रिकेट खेळाडू ही धोनीची ओळख आख्या जगाला आहे.

क्रिकेट विश्वामध्ये यशस्वी कर्णधार, फलंदाज  च्या विविध पातळ्यांवर यशस्वी ठरलेल्या महेंद्रसिंह धोनी याने आता पोल्ट्री व्यवसायात उतरायचे ठरवले असूनपोल्ट्री मधील कडकनाथ जातीच्या कोंबड्या पालनात तो उतरला आहे. या व्यवसायाची सुरुवात करताना त्यांनी मध्यप्रदेशातील झाबुवा येथून कडकनाथ जातीच्या दोन हजार कोंबड्या खरेदी केले आहेत. येथील विनोद मेडा सोबत  धोनीने कडकनाथ कोंबड्यांच्या बाबतीत करार केला असून विनोद मेडाने कडकनाथ कोंबड्यांची दोन हजार पिल्ले धोनीचा रांची येथील फार्महाऊसवर पाठवले आहेत.

 कडकनाथ कोंबडी ला आहे खूप मागणी

 पोल्ट्रीमध्ये कडकनाथ कोंबडी ला खूपच मागणी असून ही जात मुळात मध्य प्रदेशातील धार आणि झाबुवा, छत्तीसगडमधील बस्तर, गुजरात आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात जास्त प्रमाणात आढळते. ही कोंबडीचे मांसआरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्यामुळेत्याची मागणी जास्त आहे.

यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असल्याने हृदय आणि  मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. देशात बरेच शेतकरी आता कडकनाथ कोंबडीचे पालन करून बराच पैसा कमवत आहेत. कडकनाथ मध्ये 25 ते 27 टक्के प्रथिने असतात. मध्यप्रदेश सरकारने कडकनाथया प्रजाती कडे विशेष लक्ष पुरवले असून 2018 मध्ये मध्य प्रदेश सरकारचे तत्कालीन सहकार मंत्री विश्वास सारंग यांनी कडकनाथ ॲप भोपाल मध्ये लॉन्च केले. हे ॲप सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्म उपलब्ध असून याच्या मदतीने कडकनाथ प्रजातीचे पिल्ले देशात कुठेही मागवता येते. झाबुवा मधील मूळ असलेल्या कडकनाथ कोंबडी ला स्थानिक भाषेमध्ये  काली मास असे देखील म्हणतात.  या कोंबडीचे चिकन भारतीय प्रकाराच्या असून या प्रजातीचे त्वचेपासून तर पिसापर्यंत चा रंग काळा असतो. या कोंबडीचे अंडी, जिवंत कोंबड्या आणि मांस इतर कोंबड्यांच्या प्रजातींच्या तुलनेत महागड्या दराने विकले जाते.मध्य प्रदेशातील झाबुआआणि छत्तीसगड या राज्यांनीही कडकनाथ जातीच्या कोंबड्या वर हक्क व्यक्त केला होता व हा लढा कोर्टापर्यंत पोहोचला.

2018 मध्ये छत्तीसगड सोबत कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर झाबुवा ने त्यासाठी जीआय टॅग मिळवला.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:शरद पवार ऊस उत्पादकांना डोळ्यासमोर ठेवता त्यावर प्रक्रिया करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण करता

नक्की वाचा:ऐका बुलडोझरची कहानी! काय आहे बुलडोझरचे खरे नाव आणि केव्हा झाले पहिल्यांदा हे यंत्र तयार?

नक्की वाचा:बातमी अतिशय कामाची! तुमच्या आधार कार्डचा कोणीही गैरवापर करत आहे का? तपासा अगदी दोन मिनिटात

English Summary: mahindrasing dhoni take entry in poultry bussiness keeping kadaknaath hen Published on: 26 April 2022, 10:48 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters