आपल्याला माहित आहेच की महाराष्ट्रामध्ये आंबा,सिताफळ,चिंच,आवळा,जांभूळ आणि बोर यासारख्या फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. परंतु यांना कोरडवाहू असल्यामुळे उन्हाळ्यात जगवणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी काही तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकतो. याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
कोरडवाहू फळझाडे जगवण्याचे तंत्रज्ञान
1- आच्छादनांचा वापर- पिकांची वाढ होत असताना पिकांच्या पानाच्या माध्यमातून तसेच जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याची वाफ होते व ती वातावरणात निघून जाते. त्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाया जाणारे पाणी झाडाच्या सभोवती आच्छादनांचा वापर करून थांबवता येते.
यामध्ये झाडाच्या आळ्यामध्ये दहा सेंटिमीटर जाडीचे आच्छादन करतात. यासाठी वाळलेले गवत ज्वारी, गहू किंवा उसाचे पाचट यांचा वापर करणे चांगले ठरते. अच्छादन करण्याच्या अगोदर उन्हाळ्यामध्ये 50 ग्रॅम लिंडेन पावडर टाकावी.
तसेच तुम्ही आच्छादनासाठी काळ्या मेन कापडाचा देखील वापर करू शकतात. यासाठी आळ्याच्या आकाराचे तीस गेज जाडीचे मेणकापड व्यवस्थित त्याचे तुकडे करून आळ्यामध्ये पसरावे व मध्यभागी खोडाच्या आकाराचे छिद्र करावे. यामुळे बाष्पीभवन थांबवले जाते व जमिनीतील पाण्याची उपलब्धता व झाडांना जगण्यासाठी लागणारे पाणी मिळते.
नक्की वाचा:फळबागेत 'फुलांचे आंतरपीक' एक वाढीव उत्पन्नाचा स्त्रोत, वाचा फायदे आणि घ्यायची काळजी
2- बास्पीरोधकांचा वापर- उन्हाळ्यामध्ये झाडाच्या पानांच्या माध्यमातून बाष्पीभवनाच्या माध्यमातून पाणी जाऊ नये यासाठी सूर्यप्रकाश व तीव्र तापमान असल्यामुळे पानाचे तापमान देखील वाढते. ही प्रक्रिया वर नियंत्रण ठेवण्यासाठी बाष्परोधक रसायनांचा वापर सुरू झाला आहे.
केओलीनचे आठ टक्के भुकटी द्रावण पानांवर फवारावे. पानांवर पडणाऱ्या पांढऱ्या केओलिन मुळे सूर्यकिरण परावर्तित होतात त्यामुळे पानांवर पडणारी उष्णता कमी होऊन बाष्पीभवन कमी प्रमाणात होते.
3- विडब्रेक प्रतिरोधक- फळबागे सभोवती स्वतंत्र विडब्रेक प्रतिरोधक निर्माण करणे उन्हाळ्यात अत्यंत गरजेचे आहे. वारा प्रतिरोधकसाठी शेवरी,ज्वारी किंवा मक्याच्या ओळी,
जांभूळ किंवा ग्लीरेसिडिया पीके फळझाडाच्या प्रकारानुसार लावावेत. यामुळे बागेत गरम हवा येण्याचे थांबते व बागेच्या आद्रता वाढविण्यास मदत होते. त्यामुळे बागेतील तापमान दोन ते तीन अंश सेंटिग्रेड कमी होऊ शकते.
4- उन्हाळ्यात सावली करणे- उन्हाळ्यामध्ये कडक सूर्यप्रकाशामुळे गरम हवेमुळे लहान रोपांना सावलीची अत्यंत आवश्यकता असते.
यासाठी आपल्याकडील उपलब्ध वस्तूंचा वापर करावा. या वस्तूंचा वापर करताना झाडांचा आकार तसेच झाडाचे क्षेत्रफळ आणि शेतात असलेल्या वस्तू यावरून ठरवावे लागते. उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा तुम्हाला तयार मांडवाचा आकार तीन फूट उंच व दोन फूट रुंद आकाराची असावी.
मांडव झाडाच्या सभोवताली आणि वरून मांडव खोपी करावी.यासाठी शेतातील उसाचे पाचट,तणस,खताचा वापर करावा.याशिवाय झाडाभोवती तुराटीचे कुंपण करावे. हे कुंपण करत असताना तुराट्याचे बुळ जमिनीमध्ये व्यवस्थित गाडावे.
या पद्धतीमुळे बाष्पीभवन कमी होऊन झाडा भोवतालचे तापमान देखील कमी राहते व झाडे जगण्याचे प्रमाण वाढते. यामध्ये एरंडाचे सावली देखील तापमान कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.
यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये एरंडाच्या चार ते पाच बिया लावल्या तर उन्हाळ्यात कलमांवर सावली मिळते. तसेच आद्रता देखील वाढते व तापमान देखील कमी होते.
5- जलशक्तीचा वापर- जनशक्ती हे अतिजलशोषक असे संयुक्त रसायन असून जमिनीत टाकले तर पाणी धरून ठेवते आणि अवर्षण काळात उपलब्ध करून देते. जलशक्ति जमिनीत आठ महिने कार्यक्षम राहते आणि एक किलो जलशक्ती जवळपास शंभर ते पाचशे लिटर पाणी धरून ठेवते. जमिनी प्रत्येक खड्ड्यात 100 ते 200 ग्रॅम या प्रमाणात प्रति झाड जलशक्ती पावडर वापरल्यास पाण्याची बचत होऊन पाण्याच्या पाळ्या देखील कमी लागतात.
Share your comments