1. फलोत्पादन

Mango Cultivation:वापरा 'ही' लागवड पद्धत,घ्या कमी खर्चात जास्त आंब्याचे उत्पादन आणि कमवा बक्कळ नफा

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mango cultivation

mango cultivation

जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचे हवामान आंबा फळबागेसाठी खूप अनुकूल असून सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील सगळ्यात जिल्ह्यांमध्ये आंब्याचे उत्पादन चांगल्या प्रमाणात देता येऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा उत्पादन घेतल्यास ते जास्त आणि कमी खर्चात शक्य आहे.

आंबा लागवडीच्या तसे पाहायला गेले तर काही विशिष्ट पद्धती असून जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर त्या ठिकाणी परदेशी आंबा लागवडीच्या धर्तीवर काही शेतकऱ्यांनी अति घन लागवड व इतर पद्धतींचा अवलंब करून केशर आंबा लागवड सुरू केली आहे. या लेखामध्ये आपण आंबा लागवडीसाठी उपयुक्त अशा घन लागवड पद्धती ची माहिती घेऊ.

नक्की वाचा:Integrated Management: विविध फळपिके आणि भाजीपाला पिकांवर आढळणाऱ्या 'भुरी' रोगाचे अशा पद्धतीने करा नियंत्रण

 आंबा लागवडीसाठी उपयुक्त घन लागवड पद्धत तिचे फायदे

 आंबा लागवडीच्या दोन ओळी व 2 झाडामधील अंतराचा विचार केला तर दहा बाय दहा मीटर अशी शिफारस केलेली आहे परंतु आता घन लागवड पद्धतीचा वापर केला तर पाच बाय पाच मीटर किंवा 5 मीटर बाय सहा मीटर अंतरावर आंबा लागवड करणे जास्त फायद्याचे आहे.

या अंतरावर लागवड केली तर दोन झाडांमधील अंतर दहा ते बारा वर्षापर्यंत एकमेकांना मिळून येत नाही व त्या माध्यमातून आपणास या बागेच्या माध्यमातून चार पट अधिक उत्पादन मिळू शकते. जर आपण दहा बाय दहा मीटर अंतरावर आंबा लावला तर एकरी 100 झाडे एकंदरीत बसतात.

नक्की वाचा:बिझनेस आयडिया: वर्षातील 12 महिने ही करा 'या' फळाची लागवड, कमवाल बक्कळ नफा

परंतु घन लागवड पद्धतीमध्ये पाच बाय पाच मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्‍टरी 400 झाडांची संख्या ठेवणे शक्य होते व या पद्धतीमध्ये झाडांचा घेर व उंची मर्यादित पद्धतीने ठेवता येते.

त्यासाठी वेळोवेळी आंब्याची छाटणी आणि वाढ निरोधक यांचा वापर  करता येतो. इजिप्त आणि दक्षिण आफ्रिकेत दर तीन बाय 1 मीटर अंतराने लागवड यशस्वी झालेली आहे. या ठिकाणी प्रति हेक्‍टरी 3333 झाडांची संख्या असते.

 घन लागवडीचे फायदे

1-ठराविक क्षेत्रांमध्ये जास्त उत्पादन, लहान झाडे असल्यामुळे फळांची विरळणी तसेच फवारणी व छाटणी इत्यादी कामे करणे खूप सोपे होते.

2- तसेच फळांची काढणी करण्यासाठी खुडी व झेला न वापरता हाताने काढणे शक्य होते व फळांची गुणवत्ता व प्रत सुधारण्यासाठी जे काही शक्य प्रयत्न आहे ते करणे शक्य होते.

नक्की वाचा:Manure Use! शेणखत वापरतात परंतु कसे?असेल कुजलेले तर पिकांवर होईल दुष्परिणाम,वाचा माहिती

English Summary: this cultivation method of mango orchred is so benificial and profitable for farmer Published on: 29 July 2022, 04:39 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters