1. कृषी व्यवसाय

Top 5 Agri Bussiness Idea:हे 5 शेतीशी निगडित व्यवसाय शेती सोबत देतील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this is five agi related bussiness give more profit and benifit to farmer

this is five agi related bussiness give more profit and benifit to farmer

भारत एक कृषिप्रधान देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचे योगदान मोठे आहे. कोरोना कालावधीत सगळे व्यवसाय ठप्प असताना अर्थव्यवस्थेला संजीवनी द्यायचे काम कृषी क्षेत्राने केले.

अशा कठीण परिस्थितीत देखील देशाला अन्नधान्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर  शेतीशी निगडित व्यवसाय शेतकऱ्यांना खूप चांगला आर्थिक फायदा देऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. सरकारचा देखील प्लान आहे की जर शेतीला हायटेक बनवायचे असेल तर शेतीमध्ये आधुनिक कृषी यंत्रांचा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ  आणि कमी श्रमात अधिक पिकांचे उत्पादन होऊ शकते. आज आपण या लेखामध्ये शेतीशी निगडित व्यवसाय विषयी माहिती घेऊ. या व्यवसायांच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती करणे  शक्य होईल.

 शेतीशी निगडीत पाच व्यवसाय

1- पोल्ट्री फार्म- बाजारा मध्ये चिकन आणि अंडी यांची वाढती मागणी पाहता शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय हा एक चांगला पर्याय आहे. या व्यवसायाला व्यावसायिक दृष्टिकोनातून केला तर चांगला नफा कमावता येणे शक्य आहे.

शेतकरी हा व्यवसाय अगदी शेतात काम करताना शक्य आहे. जर तुमच्या शेताजवळ किंवा शेतात अगदी कमी जागा खाली असेल तर तुम्ही या अशा ठिकाणी कोंबडीपालन करू शकतात. पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी सरकारकडून देखील मदत केली जाते.

2- मधुमक्षिका पालन- मधमाशी पालन हा व्यवसाय तुम्ही तुमच्या शेतात सुरू करू शकतात. मधमाशी पालन व्यवसाय शेतीसाठी विक्री फायदेशीर आहे. मधमाशी हे मित्रकीटक या श्रेणीमध्ये येते. याबाबतीत कृषी वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी मधुमक्षिका पालन व्यवसाय केला जातो अशा ठिकाणी पिकांचे उत्पादन चांगल्या पद्धतीने येते. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना दोन प्रकारचा फायदा होतो. पहिला म्हणजे मधमाशी ही परागीकरणामध्ये मदत करते आणि दुसरे म्हणजे मधाचे आणि मेनाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळते.या दोन्ही उत्पादनांची मागणी बाजारपेठेत मोठी आहे. त्यामुळे हे दोन्ही उत्पादन विकून शेतकरी चांगली कमाई करू शकतो.

3- विशेष भाजीपाला पिकांचे उत्पादन- शेतकरी बंधू विशेष प्रकारच्या भाजीपाल्यांचे उत्पादन घेऊन सुद्धा चांगली कमाई करू शकतात.  या भाजीपाल्याची मागणी मोठे मोठे मॉल, हॉटेल  अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. या विशेष भाजीपाला पिकांमध्ये ब्रोकोली, लाल शिमला मिरची, लाल पत्ताकोबी, मशरूम इत्यादींचा समावेश करता येईल. या प्रकारांमध्ये मशरूम ला वाळवून मशरूम पावडर बनवून बाजारपेठेतविकू शकतात. या पावडरचा उपयोग जिम मध्ये बॉडी बिल्डिंग पावडर बनवण्यासाठी देखील केला जातो. मशरूम शेती तुम्ही अगदी एका रूम मध्ये देखील करू शकतात.

4 भुईमूग प्रक्रिया उद्योग- भुईमुगाच्या शेंगा ची मागणी बाजारपेठेत खुप आहे. भुईमुगापासून तेल तर बनतेच परंतु यावर प्रक्रिया करून तुम्ही शेंगदाणे देखील बाजारात विकू शकतात. असे शेंगदाणा चे दूध सुद्धा आता बनवले जाऊ लागले आहे. यासाठी तुम्हाला कच्चामाल म्हणून भुईमुगाच्या शेंगांची आवश्यकता भासेल आणि थोडे भांडवल असणे आवश्यक आहे. प्रोसेसिंग युनिट वाढण्यासाठी सरकार कडून अनुदानाच्या स्वरूपात मदत करण्यात येते.

5- फुलांचा व्यवसाय- फुलांचा व्यवसायआज सद्यपरिस्थितीत फारच लोकप्रिय व्यवसाय मानला जात आहे.लग्न समारंभ,वाढदिवसाचे कार्यक्रमआणि बर्‍याच धार्मिक कार्यक्रमांमध्ये फुलांची मागणी राहते.

तुम्ही व्यवस्थित नियोजन करून फुलांच्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगला पैसा कमवू शकतात. बरेच लोक फुलांचे डेकोरेशनचे काम करून देखील चांगली कमाई करत आहेत. तसेच वाळलेल्या फुलांची पावडरी ला देखील बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Breaking : स्वाभिमानी संघटना: हमीभाव कायद्याच्या जनजागृतीचा डंका आता देशभरात वाजणार

नक्की वाचा:मोठी बातमी! सोलर पंप बसवण्यासाठी मोदी सरकार देणार 60% अनुदान

नक्की वाचा:सॉईल सोलरायझेशन! जमीन नांगरून चांगली तापू देणे पिक उत्पादन वाढीसाठी आहे महत्त्वाचे

English Summary: this is five agi related bussiness give more profit and benifit to farmer Published on: 12 May 2022, 01:11 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters