1. सरकारी योजना

Goat Rearing: शेळी पालन व्यवसाय करायचा आहे तर 'या' बँक देतील लोन, जाणून घ्या शेळीपालन लोन विषयी सविस्तर माहिती

भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातले बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय करतात. या प्रत्येक व्यवसायासाठी शासनाच्या बऱ्याच प्रकारच्या योजना आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this bank can give loan for goat rearing and do help to growth your bussiness

this bank can give loan for goat rearing and do help to growth your bussiness

 भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातले बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय करतात. या प्रत्येक व्यवसायासाठी शासनाच्या बऱ्याच प्रकारच्या योजना आहेत.

या योजनांच्या माध्यमातून सरकार अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करत असते. या जोड धंदे यांपैकी शेळीपालन हा व्यवसाय अगदी कमीत कमी जागेत व कमी खर्चात करता येण्यासारखे व्यवसाय आहे. बेरोजगार तरुणांसाठी हा व्यवसाय एक नवसंजीवनी ठरू शकतो. फक्त गरज आहे ती तुमच्यात असलेली जिद्द, चिकाटी आणि सातत्य या गुणांची. एवढे भांडवल तुमच्याकडे असले ना तर शेळी पालन व्यवसाय तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. या लेखामध्ये आपण शेळीपालन व्यवसायासाठी कशा प्रकारे कर्ज सुविधा उपलब्ध होते? कोण कोणत्या बँक शेळीपालनासाठी कर्ज देतात? सविस्तर माहिती घेऊ.

 शेळीपालनासाठी कोणत्या बँका देतात लोन?

 भारतामध्ये शेळी पालन व्यवसायाला चालना व प्रोत्साहन मिळावे यासाठी कर्ज देणाऱ्या अनेक बँक आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाबार्डच्या अंतर्गत ज्या बँका येतात त्या बँका शेळीपालन व्यवसाय साठी कर्ज उपलब्ध करून देतात. या यादीमध्ये या काही  बँकांचा समावेश आहे.

1- आयडीबीआय बँक

2- स्टेट बँक ऑफ इंडिया

3- कॅनरा बँक

4- व्यवसायिक बँक

5- प्रादेशिक ग्रामीण बँक

6- राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि नागरी बँक

 शेळी पालनासाठी कर्ज प्रकार(Types Of Loan)

 शेळीपालनासाठी बँकेकडून दोन प्रकारे कर्ज उपलब्ध करून दिले जाते…

 यामध्ये पहिले म्हणजे शेळी पालन सुरु करण्यासाठी कर्ज दिले जाते. म्हणजे ज्या कुणाला नवीन शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा व्यक्तीला शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय कर्ज दिले जाते. यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे शेळीपालन व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध व्हावे म्हणजे तुमच्या शेळीपालनाचा व्यवसाय आगोदर आहे  परंतु त्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ व खेळते भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी हे कर्ज दिले जाते. म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कर्जाची गरज आहे, यानुसार तुम्ही कर्ज घेऊ शकतात.

 शेळीपालनासाठी कर्ज हवे असेल तर ही पात्रता आवश्यक….(Elegibility For Loan)

 जर तुम्हाला नाबार्ड अंतर्गत शेळी पालन योजना अंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्याकडे कोणत्याही बँकेत क्रेडिट खाते असणे अनिवार्य असून तुमच्याकडे किमान दोन वर्षाच्या बँकेचे स्टेटमेंट असणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचे स्वतःचे भांडवल देखील गुंतवू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला भांडवलाची गरज वाटली तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

तुमच्या जवळची बँक शाखेत जाऊन पाच ते दहा किंवा विस शेळ्या आणि मेंढ्या यांवर कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होऊ शकते.

 किती कर्ज मिळते?(How Much Get Loan)

 शेळीपालनासाठी बँकेकडून तुम्हाला किती कर्ज मिळू शकते हे बँकांच्या विविध निकष ग्राहकांसाठी लागू करतात अशा निकषांच्या  आधारे ठराविक रकमेचे कर्ज या निकषांच्या आधारे मिळते. यामध्ये आयडीबीआय बँकेचा विचार केला तर शेळीपालनासाठी सात हजार ते पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते. विशेष म्हणजे नाबार्डच्या कार्यक्रमांतर्गत, नाबार्ड योजना अंतर्गत कर्ज घेण्यासाठी दारिद्र रेषेखालील, एस सी / एसटी श्रेणीतील कर्जावर 33 टक्के अनुदान दिले जाते. ओबीसी आणि सर्वसाधारण वर्गाला 25 टक्के अनुदान दिले जाते. जे जास्तीत जास्त 30 लाख रुपये आहे. तसेच विशेष म्हणजे मुद्रा योजना अंतर्गत सुद्धा शेळीपालनासाठी कर्ज बँकांकडून दिले जाऊ शकते. बँकांच्या मदतीने मुद्रा सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील उत्पन्न वाढवणाऱ्या क्रियाकलापांसाठी बिगर शेती क्षेत्रातगुंतलेल्या व्यक्ती आणि उद्योगांना दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

 आवश्यक कागदपत्रे(Document)

1- चार पासपोर्ट आकाराचे फोटो

2- मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट

3- पत्त्याचा पुरावा

4- उत्पन्नाचा पुरावा

5- आधार कार्ड

6- बीपीएल कार्ड उपलब्ध असल्यास

7- जात प्रमाणपत्र ( एस सी / एसटी आणि ओबीसी असल्यास )

8- वय अधिवास प्रमाणपत्र

9- शेळीपालन प्रकल्प अहवाल

10- जमीन नोंदणी दस्तऐवज

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:मोठी बातमी! मोदी सरकारच्या 'या' योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांचे कर्ज; घरबसल्या असा करा अर्ज

नक्की वाचा:Farming Business Idea: या फळाला आहे मोठी मागणी; लागवड करा आणि कमवा वार्षिक 10 लाख

नक्की वाचा:Mansoon 2022 : यंदा वरुणराजा मुहूर्त साधणार; यावर्षी देखील सरासरीपेक्षा अधिक होणार पाऊस; वाचा स्कायमेटचा मान्सून अंदाज

English Summary: this bank can give loan for goat rearing and do help to growth your bussiness Published on: 13 May 2022, 08:15 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters