1. फलोत्पादन

शेतामध्ये शेततळे बांधायचे असेल तर जागेची निवड आहे महत्वाचे, विचारात घ्या या बाबी

राज्यातील पर्जन यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाचे उपलब्धता वाढविणे यासोबतच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे योजना आणली होती.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
farmpond

farmpond

राज्यातील पर्जन यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाचे उपलब्धता वाढविणे यासोबतच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे योजना आणली होती.

या शेततळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविणे आणि त्याचा वापर ज्या वेळी पिकाला पावसाची किंवा पाण्याची गरज असेल त्यावेळी संरक्षित पाणी देण्यासाठी केला जातो. तसेच वर्षभर लागणाऱ्या पाण्याचा वापर देखील शेततळ्याच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. शेततळ्याच्या कार्यक्षम वापर व त्यातील पाण्याचा चांगला वापर करण्यासाठी शेततळ्याच्या बांधणी पासून विशिष्ट बाबींचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. या लेखामध्ये आपण शेततळ्याची जागा निवडताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात याबद्दल माहिती करून घेऊ.

 शेततळ्याची जागा निवडताना विचारात घ्यायच्या गोष्टी..

  • शेततळ्यासाठी ज्या क्षेत्रातून पावसाचे वाहून जाणारे पाणी येणार असेल त्या क्षेत्राचा उतार जवळपास चार टक्क्यांपर्यंत असावा.घळीला आडवा भराव घालून शेततळे तयार करणार त्याच्या वरच्या बाजूला घडीला चार ते सहा टक्के पर्यंत उतार असावा. म्हणजे तळ्यात साठवल्या जाणाऱ्या पाण्याला खोली जास्त मिळेल.
  • शेतीचा क्षेत्राचा विचार केला असता शेतात एका ठिकाणी पावसाचे पाणी गोळा होईल अशी जागा शेततळ्यासाठी निवडावी. म्हणजेच पृष्ठभागावरून मिळणारा अपधाव शेत तळ्यामध्ये साठवला जाईल.
  • शेततळ्याची जागा निवडताना अशी निवडावी की खोदायचा होणारा खर्च हा कमीत कमी असावा. शेततळ्यासाठी पाणी साठवणूक घनता आणि मातीकाम घनता यांचे गुणोत्तर एक पर्यंत असावा तर घळीला आडवा भराव घालून केलेल्या शेततळ्यासाठी हेच गुणोत्तर पाच ते दहा पर्यंत असावे.
  • शेततळ्याच्या साठलेल्या पाण्याचा पुनर्वापर सोयीस्कर करता येईल असे ठिकाण निवडावे.
  • शेततळ्याच्या आराखडा शेतातून मिळणाऱ्या पावसाचे वाहून जाणारे पाणी वर आधारित असावा किंवा शेतकऱ्यांची वर्षभरातील पाण्याची गरज किती आहे.संपूर्ण पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवणे शक्य नाही त्या ठिकाणी हा विचार करावा त्यानुसार शेतकऱ्याची आखणी करावी.
  • शेततळ्यातून साठवलेले पाणी बाष्पीभवन आणि  झिरपण्याद्वारे
  • या जाणार याचा अंदाज करून शेततळ्याचा आराखडा तयार करावा. जमिनीचा उतार आणि उपलब्ध पाण्याचा स्त्रोत अनुसार क्षेत्राचे प्रकार पडतात.
  • शेततळे तयार करताना त्यात येऊ शकणारी एकूण पाणी, शेततळे ज्या जागेवर तयार करायचे आहे तेथील जमिनीचा प्रकार, पाण्याची एकूण गरज, बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा व्यय या गोष्टींचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
  • शक्यतो शेततळ्याची जागा शेतातील सर्वात खोलगट भागाची अथवा टोकाचीअसावी.
  • शेतातल्या खाली जाणारी जमीन लागवडीयोग्य नसावी व या जागेतून पाझर देखील कमी असावा.
English Summary: selection of land is very important in making of farm pond Published on: 15 February 2022, 04:39 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters