1. फलोत्पादन

राज्यातील डाळिंबाच्या बागा धोक्यात, जाणून घ्या यामागील रहस्य

किरण भेकणे
किरण भेकणे
Pomegranate

Pomegranate

कृषिप्रधान देश म्हणून भारत देशाची ओळख ही संपूर्ण जगभरात आहे. कमीत कमी भारतातील 90 टक्के जनसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे शिवाय शेतातून वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न सुद्धा घेतात. भारतात प्रामुख्याने दोन हंगाम पडतात एक म्हणजे रब्बी आणि दुसरा खरीप हंगाम.या दोन्ही हंगामात वेगवेगळ्या पिकांची(fruit) लागवड करून उत्पन्न मिळवले जाते.

शेतकरी वर्ग फळबाग लागवडीकडे वळला आहे :

सध्या पीक पद्धती मध्ये मोठे बदल घडून आले आहे उत्पादनाच्या वाढीसाठी अनेक वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात शिवाय वाढता खतांचा मारा, औषधे, हायब्रीड बियाणे यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.प्रामुख्याने भारतात ज्वारी बाजरी गहू या सारखी भुसार पिके घेतली जायची. परंतु यातून मिळणार मोबदला आणि फायदा हा खूपच कमी असल्याने शेतकरी वर्ग फळबाग लागवडीकडे वळला आहे.

हेही वाचा:केसर आंब्याची सेंद्रिय शेती करून एक एकर क्षेत्रामधून कमावले 4 लाख रुपये, जाणून घ्या व्यवस्थापन

सध्या देशातील शेतकरी बांधव द्राक्षे बाग, आंबा, चिक्कू, पेरू, नारळ आणि डाळिंब या बागांची लागवड मोठ्या प्रमाणात करून उत्पन्न मिळत आहे. परंतु  जास्त  उत्पादनाच्या  हव्यासापोटी पिकांवर आणि फळबागांवर मोठ्या प्रमाणात औषध फवारणी केली जात आहे.तसेच बागांवर अनेक  रोगराई चा  सुद्धा  परिणाम होत आहे. खोडवा, तेल्या यांसारख्या रोगराई  मुळे  शेतकरी त्रस्त झाले आहेत. शिवाय वाढत्या महागाई मुळे औषधांच्या किमती मध्ये झालेली मोठ्या प्रमाणात वाढ यामुळे बऱ्याच शेतकरी वर्गानी डाळिंबाच्या बागा या काढून टाकल्या आहेत.

हेही वाचा:मोदी सरकार 'जन समर्थ' हे कॉमन पोर्टल सुरू करणार,अनेक सरकारी योजना एकाच ठिकाणी उपलब्ध

डाळिंब शेती अलीकडच्या काळात धोक्यात आली आहे कारण लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. डाळिंब शेती ही शेतकरी वर्गामुळे च धोक्यात आली आहे असे. कारण वाढत्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात खतांचा आणि औषधांचा मारा केल्यामुळे त्याचा परिणाम हा मातीच्या पोतावर होत आहे त्यामुळे जमीन नापीक होत आहे.

English Summary: Pomegranate orchards in the state in danger, find out the secret behind this Published on: 14 June 2022, 12:30 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters