1. फलोत्पादन

Organic Fertilizer: शेतकरी बंधूंनो! उसाच्या पाचटापासून अशा पद्धतीने तयार करा गांडूळ खत, पिकांना होईल फायदा

शेती आणि खते यांचा परस्पर संबंध खूप घनिष्ठ आहेत. खतांशिवाय शेती शक्यच नाही. शेतकरी पिकांपासून भरघोस उत्पादन मिळावे यासाठी रासायनिक खतांचा वापर करतात.परंतु रासायनिक खतांचा भरमसाट वापर यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडलेच परंतु जमिनीचा पोत ढासळण्याची देखील मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
making process of vermi compost from dry blades of sugercane and benifit to crop

making process of vermi compost from dry blades of sugercane and benifit to crop

शेती आणि खते यांचा परस्पर संबंध खूप घनिष्ठ आहेत. खतांशिवाय शेती शक्यच नाही. शेतकरी पिकांपासूनभरघोस उत्पादन मिळावे यासाठी रासायनिक खतांचा वापर करतात.परंतु रासायनिक खतांचा भरमसाट वापर यामुळेपर्यावरणाचे संतुलन बिघडलेच परंतु जमिनीचा पोत ढासळण्याची देखील मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.

तसेच मानवी आरोग्यावर देखील रासायनिक खतांचा भरमसाट वापर याचा दुष्परिणाम पाहायला मिळतो. या सगळ्या गोष्टींवर  उपाय म्हणजे सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करणे हाहोय.शेतकरी तसे शेणखत, कंपोस्ट खताचा मोठ्या प्रमाणात वापर आता करू लागले आहेत. परंतु शेतामधील पिकांचे उरलेल्या अवशेषांचा वापर करून देखील चांगल्या पद्धतीने खत निर्मिती करता येते.

या लेखामध्ये आपणऊस तुटल्यानंतर उरलेली पाचट बरेच शेतकरी जाळून काढतात. परंतु या पाचटाचा वापर करून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार करता येते. हे खत कशा पद्धतीने तयार करतात याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 उसाच्या पाचटापासून गांडूळ खत निर्मिती

1- जागेची निवड व शेड बांधणी - गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी खड्ड्यावर दिवसभर सावली राहावी यासाठी छप्पर करावे. त्यासाठीशेतात मिळणाऱ्या वस्तू जसे की लाकूड,उसाचे पाचट, बांबूइत्यादी साहित्यांचा वापर करावा. हे शेड उभारताना त्याची मधील उंची साडेसहा फूट, बाजूची उंची पाच फूट व रुंदी दहा फूट असावी.

छपरा ची लांबीती आपल्याकडे किती पांचट उपलब्ध आहे यानुसार कमी जास्त होऊ शकते. छपराच्या मध्यापासून 1-1 फूट दोन्ही बाजूस जागा सोडून चार फूट रुंदीचे व एक फूट उंचीच्या दोन समांतर वाफे वीट बांधकाम करून तयार करावेत व आतील बाजूने चांगल्या पद्धतीने प्लास्टर करून घ्यावे व खालील बाजूस कोबा करून घ्यावा.

एक शेड तयार करताना जास्तीचे पाणी बाहेर काढण्यासाठी तळाशी पाईप टाकावा. वाफे तयार करण्याची दुसरी पद्धत म्हणजे वाफे जमिनीच्या वर बांधण्याऐवजी आठ ते नऊ इंच खोलीचे  दोन समांतर चर काढावेत. खड्ड्यातील माती चांगली चोपून टणक करावी.

2- पाचट कुजवणे- खत तयार करण्यासाठी केलेल्या छपरा मध्ये खोदलेल्या चरामध्येतेव्हा वीट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये उसाचे पाचट भरावे.  त्याची उंची जमिनीपासून/ विट बांधकामापासून 20 ते 30 सेंटिमीटर ठेवावी.

पाचट भरतांना एक टन पाचटसाठी आठ किलो युरिया,दहा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ताजे शेण खत 100 किलो वापरावे.नंतर या सगळ्या पदार्थांचे पाण्यात मिश्रण करून घ्यावे. पाचटाला पाच ते दहा सेंटिमीटर थर दिल्यानंतर त्यावर शेणखत, युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट या द्रावणात पातळ थर द्यावा. याचबरोबर पाचट कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी पाचट कुजविणारे संवर्धक एक टनास एक किलो या प्रमाणात प्रत्येक थरावर थोडेसे वापरावे. नंतर हा खड्डा पूर्ण भरल्यानंतर त्यावर पुरेसे पाणी मारावे वपाण्याने भिजवून घेतलेल्या पोत्याने झाडून टाकावे.यावर दररोज पाणी मारत रहावे. असे एक महिना पाणी मारल्यानंतर पाचट अर्धवट कुजलेले दिसेल शिवाय उष्णता कमी झाल्याचे आढळून येते.

असे अर्धवट कुजलेल्या 1 टन पाचटासाठी दोन हजार हसीनिया फोटेडा जातीची गांडुळे सोडावी व हे गांडुळे सोडल्यानंतर सर्वसाधारणपणे अडीच ते तीन महिन्यांनी उसाच्या पाचटापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:रत्नागिरी 8' आणि 'रत्नागिरी 7'( लाल भाताचे वाण ) हे भाताचे वाण शिरगाव संशोधन केंद्राकडून विकसित, जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये

नक्की वाचा:Inspiration Story: डिझाईनिंग इंजिनिअरिंगची नोकरी सोडून धरली वाट शेळीपालनाची,वर्षाला लाखोंचा टर्नओव्हर

नक्की वाचा:शेतकरी पुत्र गोपाल उगले यांना राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार प्रदान

English Summary: making process of vermi compost from dry blades of sugercane and benifit to crop Published on: 22 May 2022, 01:45 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters