1. फलोत्पादन

जाणून घ्या आंबा लागवड तंत्र

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन १२.१२ लाख मे.टन उत्पादन मिळते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणून घ्या आंबा लागवड तंत्र

जाणून घ्या आंबा लागवड तंत्र

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन १२.१२ लाख मे.टन उत्पादन मिळते.

जमीन

मध्यम ते भारी प्रतीची, १.५ ते २.० मी. खोलाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी

सुधारित जाती व संकरित जाती

हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, पायरी, लंगडा, वनराज

अभिवृदधी किंवा रोप तयार करणे

पारंपारिक पद्धतीमध्ये आंब्याची अभिवृद्धी कोयापासून केली जाते. कोय कलम, मृदूकाष्ठ कलम, व्हिनियर कलम या पद्धतीद्वारे कलमे तयार करुन अभिवृद्धी करण्यात येते.

 

लागवड

१० X १० मी भारी जमिनीत

९ X ९ मी मध्यम जमिनीत

१ X १ X १ मी. आकाराचे खडे घेऊन शेपाखत (४० -५० किलो) + पोयटा माती + सिंगल सुपर फॉस्पेट (२ किलो) मिश्रणाने भरावेत.

खते

एक वर्ष वयाच्या झाडास १५ किलो कंपोस्ट खत, १५० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद १०० ग्रॅम पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस चर खोदून द्यावेत. दरवर्षी ही मात्रा समप्रमाणात वाढवून १० व्या वर्षापासुन प्रत्येक झाडास ५० किलो कंपोस्ट खत, १.५ किलो नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद व १ किलो पालाश बांगडी पद्धतीने जून महिन्यात द्यावे.

 

 पाणी व्यवस्थापन

पाण्याची उपलब्धता असल्यास फळधारणेनंतर ३ – ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

 

आंतरपिके

आंबा बागेत १० वर्षापर्यंत भाजीपाला, द्विदल, शेंगवर्गीय, धैंचा, ताग ही पिके आंतरपिके म्हणून घेता येतात.

 

फळांची काढणी

आंबा फळे १४ आणे (८५ %) पक्वतेची काढावीत. यावेळी फळांना लालसर रंगाची छटा येते. फळांचा रंग गर्द हिरव्यापासून फिकट होतो तसेच फळांच्या देठानजीक खोलगट भाग तयार होतो. यावेळी फळांची विशिष्ट घनता १.०२ ते १.०४ एवढी असावी. फळांची काढणी देठासहित करावी. फळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चारनंतर काढावीत.

प्रतवारी

> ३५० ग्रॅम, ३००- ३५१ ग्रॅम, २५१ ते ३०० ग्रॅम व २५० ग्रॅम पेक्षा कमी वजनाची अशी प्रतवारी करावी. प्रतवारी झाल्यावर फळे ५०० पीपीएम कार्बनडेन्झिम (०.५ ग्रॅम कार्बनडेन्झिम १ लिटर पाण्यात ) च्या द्रावणात १० मि. बुडवावीत त्यामुळे काढणीनंतर फळे कुजण्याचे प्रमाण कमी होते. त्यानंतर फळे पंख्याखाली वाळवून खोक्यामध्ये भरावीत.

 

कीड व रोग नियंत्रण

तुडतुडे

पिल्ले व पुर्ण वाढलेले तुडतुडे कोवळी पाने, मोहोर व छोट्या फळांच्या देठातून रस शोषतात. यामुळे पाने वेडीवाकडी होतात, पालवी कोमेजते, मोहोर गळतो. तसेच छोटी फळेही गळतात. मोहोराच्या वेळी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. किडीच्या नियंत्रणासाठी बागेत पुरेसा सुर्यप्रकाश राहील अशा प्रकारे फांद्यांची विरळणी करावी. वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करुन तुडतुडे पिलांच्या अवस्थेत असतानाच डायमेथोएट ३० ई.सी (१० मिली/१० ली) किंवा मेनिट्रोथिऑन (५० ई.सी (१० मिली/१० ली) कीटकनाशकाची फवारणी करावी.

 

मिजमाशी

मिजमाशी कोवळ्या पालवीच्या दांड्यावर, पानांच्या देठावर, मोहोराच्या मधल्या दांड्यावर, तसेच मोहोराच्या तु-यांवर अंडी घालते व त्यातुन बाहेर येणारी पांढरट पिवळसर अळी आतील पेशींवर उपजीविका करते. परिणामी त्या ठिकाणी बारीक फुगारे काळी गाठ तयार होते. अशा असंख्य गाठी पालवीवर व मोहोरावर दिसून येतात. व त्यामुळे पालवी व मोहोर करपतो. जून जुलैमधील पालवीवरील मिजमाशीचे नियंत्रण करण्यासाठी पावसाळ्यात उघडीप पाहून डायमेथोएट ३० ई.सी (१० मिली/१० ली) किंवा मेनिट्रोथिऑन (५० ई.सी (१० मिली/१० ली) फवारावे. या कीडीची अळी जमिनीत कोषावस्थेत जात असल्यामुळे पाऊस थांबल्यावर झाडाखालची जमीन नांगरुन त्यात मिथील पॅराथिऑनची भुकरी मिसळावी.

फळमाशी

फळ पिकण्याच्या अवस्थेत असताना मादी फळांच्या सालीत अंडी घालते. त्यातून बाहेर येणा-या अळ्या गरावर उपजीविका करतात. किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त फळे नष्ट करावीत. झाडाखाली जमीन नांगरावी. कामगंध सापळे वापरावेत.

 

रोग

भूरी

मोहर व कच्च्या फळांची गळ होते. नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने, मोहर नष्ट करावेत. ०.२% गंधकाची पहिली फवारणी करावी. १५ दिवसांनी ०.१ % डिनोकॅपची दुसरी फवारणी करावी.

 

डायबॅक

रोगग्रस्त फांद्या शेंड्यापासून वाळायला लागतात. नियंत्रणासाठी निरोगी कलमांची निवड करावी. रोगग्रस्त फांद्यांची ३ इंच खालपासून छाटणी करावी. त्यानंतर ०.३ % ऑक्झीक्लोराइडची फवारणी करावी.

 

 विनोद धोंगडे नैनपुर

English Summary: Know about technology of mango plantation Published on: 16 January 2022, 01:10 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters