1. फलोत्पादन

भावांनो! पिकांना खते देताना खतांची निवड,देण्याचे प्रमाण आणि कालावधी आहे महत्त्वाचा, वाचा याबद्दल महत्त्वाची माहिती

पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी अनेकदा शेतकरी वर्ग रासायनिक वापर करतात. खरंतर सुपीक जमिनीमध्ये पुन्हापुन्हा पीक उत्पादन घेतल्यामुळे हळूहळू जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण केले पाहिजे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
chemical fertilizer

chemical fertilizer

पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी अनेकदा शेतकरी वर्ग रासायनिक वापर करतात. खरंतर सुपीक जमिनीमध्ये पुन्हापुन्हा पीक उत्पादन घेतल्यामुळे हळूहळू जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण केले पाहिजे.

  • योग्य खते निवडणे :-
  • माती परीक्षणानुसार खत नियोजन करावे.ज्या अन्नद्रव्याची कमतरता असेल त्याचा अन्नद्रव्यासाठी खत नियोजन करावे.
  • नत्राचा पुरवठा करण्यासाठी नीम कोटेड युरियाचा वापर करावा.
  • मातीमध्ये स्फुरद कमतरता असल्यास, पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदयुक्त खतांचा वापर करावा.
  • कमी कालावधीच्या पिकांना त्वरित अन्नद्रव्ये उपलब्ध होणारे खतांचा आणि जास्त कालावधीच्या पिकांना हळूहळू अन्नद्रव्ये उपलब्ध होतील अशा खतांचा वापर करावा. जास्त कालावधीच्या पिकांना साइट्रेट विरघळणारे तर कमी कालावधीच्या पिकांना फॉस्फेटिक खताचा वापर करावा.
  • शेतात कोणते पीक घेणार आहेत,त्याआधी त्या शेतात कोणते पीक घेतले होते तसेच या पिकात कोणत्या खताचा किती प्रमाणात वापर केला गेला होता. या गोष्टींचा विचार करून खतांचे नियोजन करावे.
  • ओलसर कमी असणाऱ्या जमिनीत नायट्रेट युक्त किंवा नायट्रोजनधारी खतांचा तर सिंचन आणि उच्च पर्जन्य भागात अमोनीकलकिंवा अमाईडयुक्त नायट्रोजनधारी खतांचा वापर करावा.
  • ओलसर भागात कॅल्शिअम तसेच मॅग्नेशियम युक्त खतांचा वापर करावा. कारण अशा भागात मातीत कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता असते.
  • आम्लयुक्त जमिनीतक्षारप्रभाव पसरवणारे नायट्रोजन युक्त खतांचा वापर करावा. तसेच फास्फोरस च्या पुरवठ्यासाठी फॉस्फेटिकयुक्त मिश्रणाचा वापर करावा.
  • वाळू युक्त जमिनीत जैविक खतांचा अधिकाधिक वापर करावा.जेणेकरून  अन्नद्रव्यांचे पोषण होऊन कमीत कमी प्रमाणात नुकसान होईल तसेच अशा जमिनीत नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करून फवारणी करावी. चिकणी जमिनीत जास्त प्रमाणात जैविक खतांचा वापर केला पाहिजे.
  • खतांचा वापर कधी आणि कसा करावा :-
  • शेणखत, कंपोस्ट खत हिरव्या खता सारखे सेंद्रिय खते पीक पेरणीपूर्वी शेतात चांगल्या प्रकारे मिसळून द्यावे.
  • फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खताचीपूर्ण मात्रा पीक पेरणीच्या वेळी शेतात चांगल्याप्रकारे जमिनीत मिसळून द्यावे.
  • नायट्रोजन फॉस्फेटिक आणि पोटॅशिक ही खते पेरणीच्या वेळी शेतात 3 ते 4 सें.मी. खाली आणि 3 ते 4 सें.मी. बाजूला दिले पाहिजे. तसेच फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम लोह आणि जस्त या खतांना नेहमी पीकांच्या मुळाजवळ द्यावे.
  • खतांना मिश्रणाच्या स्वरूपात उभ्या पिकात फवारणी केल्यास नायट्रोजन वियुविजन, स्थिरीकरण,डिनायाट्रीफिकेशनइ.द्वारे होणाऱ्या नुकसानापासून वाचविले जाऊ शकते.

 खतांचे प्रमाण कसे घ्यावे:

  • भात आणि गहू या पिकांसाठी, जर गहू पिकाच्या शिफारशीनुसार खतांची मात्रा दिली असेल तर भातपिकाच्या पुढील पेरणीसाठी फॉस्फरस आणि पोटॅश या खतांची मात्रा देऊ नये.भात पिकासाठी निमकोटेड आणि जास्त कॉटेडनायट्रोजन खतांचा वापर करावा.
  • रब्बी पीक पेरणीच्या आधी शेतात हिरव्या खतांचेपीक घेतले गेले असेल आणि वेळेवर पीक जमिनीत गाडले गेले असतील तर रब्बी पिकांची पेरणी वेळी नत्राची मात्रा प्रतिहेक्टर40 किलोने कमी करावी.
  • जरशेतात शेणखत किंवा कंपोस्ट वापरले गेले असेल,तर पुढीलपिकासाठी नंतर 5 किलोथोरात2.5किलो आणि पालाशच्या 5 किलो प्रति टन या प्रमाणात नत्र,स्फूरद आणि पाळषच्या मात्रेत कमी द्यायला हवे.
  • पिकाची योग्य वेळेत पेरणी केल्यास खतांची उत्पादन क्षमता वाढत असते. पिकातील दोन ओळींतील अंतर आणि  दोन रोपातील अंतर योग्य ठेवल्यास खतांचा योग्य आणि जास्त पुरवठा होतो.
English Summary: duration,quantity and proper method is crucial in applt fertilizer to crop Published on: 05 March 2022, 02:36 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters