1. फलोत्पादन

यामुळे करता येते उत्पादनात लक्षणीय वाढ

शेतकरी बंधुनी माईकोरायझा बुरशीचा अवश्य वापर करावा व उत्पादनात वाढ करावी

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
यामुळे करता येते उत्पादनात लक्षणीय वाढ

यामुळे करता येते उत्पादनात लक्षणीय वाढ

सर्व सामान्य शेतकरी व माहितगार व्यक्तींना यातील खालचे दोन बॅक्टेरिया (PSB व KSB) परिचीत आहेत.
तर आता माहिती घेऊ या यातील सर्वात पहिल्या घटकाची म्हणजे 
Cellulose degrading Bacteria. 
याच्या नावातच याची ओळख आहे.Cellulose (सेल्युलोज)म्हणजे कुठल्याही सेंद्रीय पदार्थातील मुख्य घटक.याला degrade करणारे म्हणजेच सडवणारे किंवा कुजवणारे सूक्ष्म जीवाणू म्हणजेच काष्टा पासुन किंवा टाकाऊ पदार्थापासून कार्बन विलग करणारा जिवाणू.हा जिवाणू औद्योगिक वापरात खुपच मोठ्या प्रमाणात सडवन्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
याच जिवाणू वरूनच या प्रोडक्टचे नाव ठरविण्यात आलें आहे.तेंव्हा साहजीकच याच जिवाणूंची तीव्रता(काऊंट)या कल्चर मध्ये सर्वात जास्त आहे.त्यामुळे याचा वापर कीड नियंत्रणासाठी ही करता येतो.वेस्ट डिकंपोजर मधील याच जिवाणूंच्या फवारणीने किडींची मेणयुक्त(wax)त्वचा रखरखीत करून त्यांचा उत्कृष्ट परीणाम सोबतच्या साधारण विषाने(औषधी)मिळवणे सहज शक्य आहे,परंतु पिकास जमीनीतूनही बरेच काही हवे असते.ज्याचा पुरवठा जमीनीतील सेंद्रीय कर्बाच्या विघटनातून होत असतो.यासाठी जमीनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण(आच्छादन किंवा टाकावू पदार्थ)जमिनीत वाढवण्यासाठी प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे आहे.अश्या वेगवान विघटकाचा वापर करताना जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी विशेष श्रम घेणेही तितकेच आवश्यक आहे.

आता पाहुया डिकंपोजर मधिल दुसरा जिवाणू 

Xylan degrading Bacteria

Xylan (झायलान) म्हणजे काय?सेंद्रीय पदार्थातील पेशींच्या आतील आवरणास Xylan असे शास्त्रीय नाव आहे.या आवरणाचे विघटन करणारे सूक्ष्म जीवाणू.वरील दोन्ही प्रकारचे काम करणारे सूक्ष्म जिवाणू म्हणजे Pseudomonas,Bacillus,Rhizobium हे आहेत. 

आता पाहुया 'डि-कंपोजर' मधिल तिसरा जिवाणू PSB (Phosphorus solubilizing Bacteria) दाेन अथवा तीन कणांनी बनलेल्या फॉस्फाेरसचे विघटन करुन सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये रुपांतरीत करुन मुळांना देतो. 

4)KSB (Potash solubilizing Bacteria) मातीतील पाेट्याश सुलभतेने घेण्यास मुळांना मदत करते. 

 

व्हर्टिसिलियम लिकानी:

(वरुणास्त्र)

श्रीलंकेत१८६१ साली कॉफी पिकावर ही बुरशी शास्त्रज्ञांना आढळुन आली,त्यानंतर जावा देशात स्केल(खवले किड)किडीच्या मृत अवशेषांच्या भोवताली पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसुन आली.झिमरमॅन या शास्त्रज्ञाने ह्या बुरशीचे शुध्द(Pure Culture)स्वरुप वाढवून त्या बुरशीचा किड नियंत्रणासाठी काही उपयोग होऊ शकतो का यासंबधी अधिक संशोधन सुरु केले.

१९३९ साली ब्राझिल मध्ये विगेस ह्या शास्त्रज्ञाने व्हर्टिसिलयम चा वापर कॉफी पिकातील खवले किड नियंत्रणासाठी केला आणि त्यानंतरच ह्या बुरशीला आताचे नाव प्राप्त झाले.व्हर्टिसिलियम लेकॅनी ही बुरशी पिकांवरिल विविध किडींच्या

नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.मावा,पिठ्या ढेकूण,फुलकिडे,लेपिडोप्टेरा (अळिवर्गीय)आणि डिप्टेरा (माशीवर्गीय)गटातील इतर किडी,पांढरी माशी तसेच काही सुत्रकृमींच्या विरोधात ही बुरशी कार्य करते. 

 

ही बुरशी लैंगिक पध्दतीने पुनरुत्पादन करु शकत नाही.अलैंगिक पध्दतीने तयार केले जाणारे कोनिडोस्पोअर्स हे किडीच्या तसेच काही बुरशींच्या नियंत्रणासाठी उयपुक्त ठरतात.

 

व्हर्टिसिलियम चे कोनिडीयोस्पोअर्स रुजताना किडींच्या शरीरात घातक आक्रमण करुन तसेच हायड्रोलायटिक एन्झाईम्स स्रवुन प्रवेश मिळवतात.ही बुरशी किडीच्या अंडी-तसेच अळी(निप्फल स्टेज),प्रौढ अवस्था नियंत्रणात येऊ शकते.व्हर्टिसिलियम तिच्या मायसेलिम च्या सहाय्याने पानांच्या खालील बाजुस चिटकुन देखील राहते.किडीला संसर्ग झाल्यानंतर ७ दिवसात किडीच्या शरीराच्या भोवताली तसेच किडीच्या शरीरावर पांढऱ्या पिवळसर रंगाचे कोनिडीया दिसुन येतात.

व्हर्टिसिलियम तिच्या मायसेलिम च्या सहाय्याने पानांच्या खालील बाजुस चिटकुन देखील राहते.किडीला संसर्ग झाल्यानंतर ७ दिवसात किडीच्या शरीराच्या भोवताली तसेच किडीच्या शरीरावर पांढऱ्या पिवळसर रंगाचे कोनिडीया दिसुन येतात.व्हर्टिसिलियम तिच्या मायसेलियम मधुन ब्रासिनोलाईड ह्या सायक्लोडेप्सिपेप्टाईड ह्या गटातील विषारी द्रव स्रवते,तसेच डिपिकोलिनिक अँसिड,ब्युव्हिरिसिन,डिसिनेडोईक आणि १०-हाड्रॉक्सि ८-डिसिनोईक हे विषारी द्रव देखिल स्रवते,ज्यामुळे किडींच्या शरिरात प्रवेश मिळवणे तसेच किडींचा नायनाट करण्यास मदत मिळते.

 

व्हर्टिसिलियम काही पिकांच्या पेशींत देखील आत जाऊन राहते,त्यामुळे पिकाच्या नैसर्गिक प्रतिकारक क्षमतेला देखील चालना मिळते.व्हर्टिसिलियम बुरशी सिस्ट निमॅटोड(Heterodera schachti)च्या अंडी आणि प्रौढ अवस्था देखिल नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरते.ह्या निमॅटोडच्या अंड्यामधे शिरुन हि बुरशी त्यात असणाऱ्या घटकांवर उपजिविका करते

English Summary: Do aslo production increased Published on: 16 January 2022, 09:30 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters