1. फलोत्पादन

खजूर शेती: खजुराचे एक झाड देते 50 हजार रुपयांचे उत्पन्न, होऊ शकता काही वर्षात करोडपती

भारत हा कृषिप्रधान देश असून भारतामध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकऱ्यांनी आता शेतीची परंपरागत पद्धत आणि पारंपरिक पिकेयेणे बंद केले असूनआधुनिकतेची कास धरूनतरी वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाजीपाला त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
date farming is so benificial and give more profit to farmer

date farming is so benificial and give more profit to farmer

 भारत हा कृषिप्रधान देश असून भारतामध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकऱ्यांनी आता शेतीची परंपरागत पद्धत आणि पारंपरिक पिकेयेणे बंद केले असूनआधुनिकतेची कास धरूनतरी वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाजीपाला त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत.

 शेतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि कष्ट याची जोड देऊन शेतकऱ्यांनी शेतीत वाखाणण्याजोगी प्रगती केली आहे. आता पीक पद्धती बद्दलच किंवा लागवडी बद्दल बोलायचे झाले तर  विदेशी भाजीपाला देखील शेतकरी पिकवत आहेत फळबागांमध्ये ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरीइतकेच काय तर सफरचंदाचा प्रयोग देखील महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला.

अशा परिस्थितीत खजूर शेतीआपल्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा आणि जास्त उत्पन्न देणारा ठरू शकतो. खजुराचा उपयोग विविध प्रकारचे ज्यूस, जॅम, लोणचे  आणि बेकरी अशा अनेक गोष्टींमध्ये वापरली जातात.तसे पाहायला गेले तर खजूर शेतीच्या लागवडीचा विचार केला तर याला एवढा खर्च नाही.एका झाडापासून पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कमाई आरामात निश्चितपणे मिळवता येऊ शकते.पुढे योग्य नियोजन केले तर शेतकरी काही वर्षात करोडपती देखील होऊ शकतात.

आता या खजुराच्या लागवडीचा विचार केला तरपाण्याचा योग्य निचरा होणारी आणि वालुकामय जमीन सर्वात योग्य असते.व तापमान 30 अंशपेक्षा  जास्त असता  कामा नये. 30 अंश तापमानातखजूर फळांची वाढ खूप चांगली होते. तसेच फळ पक्व होण्यासाठी 45 अंश तापमान आवश्यक असते. त्याचा अर्थ प्रखर सूर्यप्रकाश या फळाच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक असतो.

 खजूर लागवडीसाठी शेतीची तयारी

 खजूर लागवडीसाठी वालुकामय आणि भुसभुशीत माती लागते. यामध्ये खजूर लागवड करणे अगोदर जमीन तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. साठी अगोदर जमिनीची खोल नांगरणी करून घ्यावी शेत काही दिवस असेच पडू द्यावे. पुन्हा दोन तीन वेळा नांगरणी करावी. 

कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील माती भुसभुशीत करावी व महत्त्वाचे म्हणजे जमीन समतल करून घ्यावी. कारण यामुळे जमिनीत पाणी तुंबणार नाही आणि पाण्याची निचऱ्याची व्यवस्था योग्य राहील व झाडाचा विकास देखील चांगल्या पद्धतीने होईल.

 खजूर या पद्धतीने लावावे

खजुराच्या रोपांची लागवड करण्यासाठी शेतात एक मीटर अंतरावर खड्डे तयार करावे.या खड्ड्यांमध्ये 25 ते 30 किलो शेण मातीसह टाकावे.महत्त्वाचे म्हणजे खजुराची रोपे आणताना ती कोणत्याही सरकारी नोंदणी असलेल्या रोपवाटिकेतून विकत घ्यावी.नंतर ही रोपे खड्ड्यात लावावी.

खजूर लागवडीसाठी ऑगस्ट महिना महत्त्वाचा मानला जातो. एका एकर मध्ये 70 खजुराची रोपे लावता येतात व लागवडीनंतर तीन वर्षांनी उत्पादन देण्याससुरुवात होते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:7 pay commission: फिटमेंट फॅक्टरवर आज घेतला जाऊ शकतो मोठा निर्णय,किमान वेतन 26 हजार रुपये होण्याची शक्यता

नक्की वाचा:IMD Alert: उत्तर भारतात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; येत्या 5 दिवसात 'या' ठिकाणी कोसळणार पाऊस

नक्की वाचा:Investment For Child: तुमची मुलं प्रौढ होईपर्यंत करोडपती करायचे असतील तर वापरा हे पर्याय, नक्कीच होईल फायदा

English Summary: date farming is so benificial and give more profit to farmer Published on: 25 May 2022, 12:25 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters