पोषक आहार हा आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. सध्या सर्वसामान्य माणसे स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झालेली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींचा ओढा सेंद्रीय पद्धतीने बनवलेल्या अन्नाकडे वळू लागला आहे. भारतीय लोकांचे जीवनमान बदलत असून नागरिकांची आरोग्यविषयक जागरूकता वाढू लागली आहे.
परंतु हेच जंक फूड अनेक आजारांचे कारण बनते. यामुळे लहान वयातच मधुमेह, ब्लड प्रेशर, कॅन्सर यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. या आजारांपासून वाचण्यासाठी अनेकजण सध्या सेंद्रिय फूडचा आधार घेताना दिसत आहेत. सेंद्रिय पदार्थांमध्ये, प्रथिने, धातू, विकरे ,कॅल्शिअम, लोह यांसारखे गुणधर्म असतात. हे सर्व गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं.
सेंद्रिय फूड म्हणजे काय?
सेंद्रिय फूड तयार करण्यासाठी कोणत्याही केमिकल किंवा औषधांचा उपयोग केला जात नाही. तसेच या पदार्थांची शेती करताना कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. सेंद्रिय पदार्थ पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने उगवण्यात येतात.
सेंद्रिय पदार्थ असे ओळखाल
सेंद्रिय पदार्थांची चव इतर पदार्थांपेक्षा थोडी वेगळी असते. सेंद्रिय पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या मसाल्यांचा गंधही इतर मसाल्यांपेक्षा जास्त येतो. तसेच सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात आलेल्या भाज्या शिजण्यासाठी जास्त वेळ घेत नाहीत, लवकर शिजतात.
आजारांपासून बचाव करण्यासाठी सेंद्रिय पदार्थ फायदेशीर
सेंद्रिय पदार्थांचे उत्पादन घेताना कोणत्याही केमिकल्सचा वापर करण्यात येत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये पोषक तत्वे ही इतर पदार्थांच्या तुलनेने अधिक असतात. त्यामुळे त्यांच्या सेवनाने रक्तदाबशी निगडीत समस्या, मायग्रेन, मधुमेह आणि कॅन्सर यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. तसेच यांचे सेवन केल्यानं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाणही फार कमी असतं. याव्यतिरीक्त दररोज सेंद्रिय पदार्थांचं सेवन केल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात आणि त्वचा तजेलदार होते.
आजकाल लोकांमध्ये प्रतिजैविक प्रतिकार वाढत आहे. यासाठी आवश्यक नसतानाही प्रतिजैविक घेण्याव्यतिरिक्तचे कारण म्हणजे आपण खाल्लेल्या गोष्टींचा वापर बिघडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना प्रतिजैविक दिला जातो. जेव्हा आपण अशा गोष्टी खातो तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते.
-
सेंद्रीय पदार्थातून 40 टक्के जास्त ‘‘अॅन्टीऑक्सिडन्टस्’’ मिळतात. त्यामुळे ह्रदयविकार किंवा कर्करोग आदी रोगांपासून बचाव होऊ शकतो.
-
सेंद्रीयपदार्थाच्या सेवनामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होवू शकते.
-
सेंद्रीयशेतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होते तसेच प्रदूषणालाही आळा बसतो. मातीचे संरक्षण होऊन पाणी मुरण्याची क्षमता वाढते.
-
नैसर्गिक खतांच्या वापरामुळे पदार्थाची मूळ चव, रंग, स्वाद टिकून राहतात.
-
सेंद्रीय उत्पादने वाढवल्याने व्यापारार्थ वाढविण्यात येणाऱ्या प्राण्यांची प्रजोत्पादन क्षमता वाढते.
-
सेंद्रिय पदार्थ घेताना त्या वर अन्न सुरक्षा आणि भारताचे मानके प्राधिकरण नुसार जैविक भारत चे चिन्ह ग्राहकांनी बघून घ्यावे.
Share your comments