कोणताही शुभारंभ करताना म्हणजेच एखाद्या चांगल्या कामासाठी जाताना, परीक्षेला जाताना आपल्या हातात दही साखर ठेवण्याची परंपरा आधीपासूनच आहे. तसं बघायला गेलं तर दह्याचे आपल्या आरोग्यला खूपच फायदे आहेत. बरेचजण दररोज दह्याचा जेवणामध्ये समावेश करतात. दही केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नसून ती आपल्या त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे.
त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी दहीचे सेवन उपयुक्त आहे. दह्यामुळे आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर होतात. पण तुम्ही देखील दह्यात साखर टाकता का? टाकत असाल तर आजच बंद करा. कारण दह्यात साखर टाकल्यास त्याचा शरीराला फारसा उपयोग होत नाही. मात्र आंबट दही खाणं सर्वांनाच शक्य नाही.
तुम्ही दह्यात साखरेऐवजी गूळ टाकला तर त्याने तुमच्या आरोग्याला खूप फायदा होतो. जसे दह्याचे फायदे आहेत तसेच गुळाचेदेखील फायदे आहेत. गुळामध्ये लोह भरपूर प्रमाणात आढळते. आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत दह्यात गूळ टाकल्यास शरीराला कोणते फायदे होतात.
काय सांगता! लग्नाचं व-हाड आलं बैलगाडीतून; पाहुणे मंडळी झाले आवाक
पचन प्रक्रिया सुरळीत होते -
गुळामध्ये असलेल्या पोषणतत्वामुळे पचन प्रक्रिया संदर्भातील आजार दूर होण्यास मदत होते. गुळामुळे पचन प्रक्रिया सुरळीत होऊन पोटामधील गॅस ची समस्या दूर होते. दही गुळाचे सेवन हिवाळ्यात केले तर त्या दिवसांत होणा-या पोटाच्या समस्या कमी होतात. जर तुम्ही दररोज दह्याचे सेवन केले तर पोटाचे विकार दूर होण्यास मदत होईल.
रक्ताची कमतरता दूर करण्यास उपयुक्त -
तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी दही आणि गूळाचे सेवन मदत करते. म्हणून अशा वेळी, दही आणि गूळ आपल्यासाठी फायद्याचे आहे.
corona vaccine: कोरोनाचे डोस नष्ट करणार; अदर पूनावाला यांची माहिती,कारणही सांगितले
सर्दी-खोकल्यापासून संरक्षण -
पावसाळा सुरु झाल्यावर तसेच दररोजच्या पाण्यात बदल झाला तर अनेकांना सर्दी अन् खोकल्याचा त्रास हा होतोच. गुळामध्ये मिनरल्स, लोह, मॅग्नीशियम, पोटेशियम, कॅल्शियम, सेलेनियम, मँगनीज व कॉपरसारख्या गुणधर्म असल्यामुळे अनेक आजार दूर होतात. जर तुम्हाला सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर दही आणि गुळाच्या मिश्रणात काळी मिर्चीची पावडर टाकून मिश्रण करा. आणि त्याचे सेवन करा .
वजन कमी करण्यास उपयुक्त-
गूळ आपल्या आरोग्यास फायदेशीर आहे. कारण गुळावर कोणतीच रासायनिक प्रक्रिया केलेली नसते. त्यामुळे गुळ साखरेहून अधिक पोषक आहे. यामुळेच दररोज दह्यासोबत गुळाचे सेवन करावे.
महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! चक्क मेंढ्याला झाला 3 वर्षांचा तुरुंगवास; कारण ऐकून बसेल धक्का
Share your comments