1. आरोग्य सल्ला

corona vaccine: कोरोनाचे डोस नष्ट करणार; अदर पूनावाला यांची माहिती,कारणही सांगितले

सध्या कोरोनाचे सत्र वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास वारंवार सांगितले जात आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी याबाबत एक महत्वाची बातमी सांगितली आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
20 कोटी डोस नष्ट करणार

20 कोटी डोस नष्ट करणार

corona vaccine: सध्या कोरोनाचे सत्र वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास वारंवार सांगितले जात आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी याबाबत एक महत्वाची बातमी सांगितली आहे. काही तांत्रिक कारणामुळे आता कोरोना प्रतिबंधक लसीचे 20 कोटी डोस नष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एका भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी या माहितीचा खुलासा केला आहे. 20 कोटी डोस नष्ट केले तरी कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीवर याचा कोणताच परिणाम होणार नाही. लस निर्मितीची प्रक्रिया चालूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लस निर्मिती प्रक्रियेसाठी जो विशिष्ट प्रकारचा कच्चा माल लागतो तो परदेशातून आयात केला जातो.

ही प्रक्रिया अधिक जलदगतीने तसेच सुरळीत होणे आवश्यक असल्याचे पूनावाला यांनी म्हटलं आहे. शिवाय लसीच्या चाचण्या, त्याची निर्मिती प्रक्रिया, व वितरण यातील अडचणी दूर झाल्यास लस निर्मिती व लस वितरणाचा वेग वाढेल. परिणामी आजाराशी लढणे अधिक सोपे होईल. देशातील अधिकाधिक नागरिक आजाराचा सामना करू शकतील.

केंद्र सरकारच आहे शेतकऱ्यांचा शत्रू? आता साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी सुरू

लस घेतल्याचे ऑनलाइन प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यामुळे तसेच त्याला जागतिक मान्यता मिळाली तर लस घेऊन स्वतःला सुरक्षित करण्याकडे नागरिकांचा कल वाढेल असेही पूनावाला यांनी म्हटले आहे. सीरमची कोरोना प्रतिबंधक लस कोरोना विषाणूच्या अनेक आधुनिक अवतारांना प्रतिबंध करण्यास सक्षम आहे, अशी माहिती पूनावाला यांनी दिली.

दुकानदारांनो शेतकऱ्यांना फसवत असाल तर सावधान; मंत्री सुनील केदार यांची मोठी घोषणा

कोरोना संकटाविरुद्ध सीरमची लढाई यशस्वी होण्यात सीरमच्या अनुभवी कर्मचारीवर्गाचे संघटीत प्रयत्न कारणीभूत असल्याचे पूनावाला म्हणाले. या वर्षाच्या अखेरीस सर्व्हायकल कॅन्सर या आजारावर,सीरम इन्स्टिट्युट एक प्रतिबंधात्मक लस बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे.

याव्यतिरिक्त डेंग्यू प्रतिबंधात्मक लस तसेच पाच आजारांना प्रतिबंध करणारी लस बाजारात आणण्याची तयारी पण सीरम इन्स्टिट्युट करत आहे. हे सर्व ठरल्या प्रमाणे झाले तर सीरम इन्स्टिट्युट 'लस क्षेत्रा'त प्रगतीची नवी शिखरे पार करेल, असे मत पूनावाला यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! लग्नाचं व-हाड आलं बैलगाडीतून; पाहुणे मंडळी झाले आवाक
आयआयटीत शिक्षण नंतर करोडोंची नोकरी सोडून धरली शेतीची वाट; वाचा यशस्वी जोडप्याची कहाणी

English Summary: corona vaccine: will destroy the dose of corona; Information about Adar Poonawala, also stated the reason Published on: 25 May 2022, 04:48 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters