1. बातम्या

काय सांगता! चक्क मेंढ्याला झाला 3 वर्षांचा तुरुंगवास; कारण ऐकून बसेल धक्का

आजपर्यंत आपण माणसांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळताना पाहिलं आहे. गुन्हा कोणता आहे त्यावरून त्याचे शिक्षेचे स्वरूप ठरते. मात्र तुम्ही कधी प्राण्याला शिक्षा झाल्याचे किंवा त्याला तुरुंगात टाकल्याचे ऐकले आहे का?

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
मेंढ्याला झाला 3 वर्षांचा तुरुंगवास

मेंढ्याला झाला 3 वर्षांचा तुरुंगवास

Sudan: आजपर्यंत आपण माणसांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळताना पाहिलं आहे. गुन्हा कोणता आहे त्यावरून त्याचे शिक्षेचे स्वरूप ठरते. मात्र तुम्ही कधी प्राण्याला शिक्षा झाल्याचे किंवा त्याला तुरुंगात टाकल्याचे ऐकले आहे का? असाच एक प्रकार घडला आहे आफ्रिकेत. आफ्रिकेतून आलेली ही बातमी पाहून तुम्हीही चकित व्हाल.

आफ्रिकेत एका महिलेवर मेंढ्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात महिला मृत पावली. महिलेला निर्घृणपणे ठार केल्यामुळे आता या मेंढ्याला एक नाही दोन नाही तर तब्बल 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मेंढ्याला ही शिक्षा देण्यापूर्वी जवळजवळ आठवडाभर त्याला कारागृहात ठेवण्यात आले होते. सध्या सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे.

दक्षिण सुदानमधील या मेंढ्याला ही अनोखी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. माहितीनुसार मेंढ्याने महिलेला शिंगाने मारले त्यामुळे तिच्या शरीरावर खोल जखमा झाल्या. हल्ला इतका तीव्र होता की, दवाखान्यात पोहोचताच या महिलेने आपले प्राण सोडले.

आयआयटीत शिक्षण नंतर करोडोंची नोकरी सोडून धरली शेतीची वाट; वाचा यशस्वी जोडप्याची कहाणी

या गुन्ह्यामुळे मेंढ्यावर ताबडतोब कारवाई करण्यात आली असून अटकही झाली आहे. एवढंच नाही तर मेंढ्याच्या मालकालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
संबंधित ४० वर्षीय महिला हल्ल्यात गंभीर जखमी होऊन मृत पावल्यामुळे मेंढ्याच्या मालकाला पाच गाई दंड म्हणून पीडित कुटुंबाला देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:
corona vaccine: कोरोनाचे डोस नष्ट करणार; अदर पूनावाला यांची माहिती,कारणही सांगितले
काय सांगता! लग्नाचं व-हाड आलं बैलगाडीतून; पाहुणे मंडळी झाले आवाक

English Summary: What do you say Sheep gets 3 years in prison; Because the shock will be heard Published on: 25 May 2022, 05:28 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters