आपल्या देशातील महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. अगदी देशाचे सर्वोच्च पद देखील त्यांनी भूषवले आहे. असे असताना ग्रामीण भागातील महिला देखील यामध्ये मागे राहता कामा नये, म्हणून सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. देशात स्वयंरोजगार आणि महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने भारत सरकार विविध योजना राबवत आहे. महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनांचा उद्देश आहे. याचा अनेक महिलांना फायदा होतो.
यामध्ये आता मोफत शिलाई मशीन योजना ही एक योजना सरकारने आणली आहे. या योजनेंतर्गत सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन देत आहे. शिलाई मशीनचा लाभ घेऊन महिला स्वत:चा रोजगार सुरू करू शकतात. या योजनेअंतर्गत सरकार देशभरातील ५० हजारांहून अधिक महिलांना शिलाई मशीन देत आहे. यामुळे महिलांना आपल्या पायावर उभे राहता येईल.
या योजनेंतर्गत ग्रामीण आणि शहरी वातावरणात राहणाऱ्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे अशा महिलांनाच मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येईल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १२ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे. त्यांना यातून रोजगार व्यवसाय निर्माण होणार आहे.
कांद्याचा नाशिकमध्ये वांदा, शेतकरी म्हणाले कांद्यासाठी पुणे मार्केटच लय भारी..
तसेच सरकारने यामध्ये विधवा आणि अपंग महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी तुमचे वय 20 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. सध्या देशातील मोठ्या प्रमाणात महिला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊन दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळवत आहेत. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, वयाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, समुदाय प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. हे असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.
महत्वाच्या बातम्या;
'आता साखर कारखानदार, संचालक आणि उत्पादक शेतकरी आत्महत्या करतील'
शेतकऱ्यांनो हा चारा ठरतोय फायदेशीर, गाईच्या दुधात होईल दुप्पट वाढ
कार-बाईक चालवणाऱ्यांची होणार दिवाळी! नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
Share your comments