केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य लोकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून त्यांना आर्थिक लाभ मिळतो. आता केंद्र सरकारने (central government) घरगुती गॅसबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
500 रुपयांची होणार बचत
कोल्हापूर शहरातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा फक्त 600 रुपयांमध्ये गॅस (gas) मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे 500 रुपयांची बचत होणार आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस वितरणासाठी शहरात 72 किलोमीटर मुख्य पाईपलाईन (Main pipeline) आणि घरोघरी गॅस पोहोचविण्यासाठी 273 किलोमीटरचे पाईपलाईनचे जाळे विणले आहे.
आनंदाची बातमी: शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी सरकार देतंय 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान
गॅस पाईपलाईन योजना
यासाठी 28 हजार ग्राहकांनी कंपनीकडे नोंदणी केली आहे. शहराच्या उर्वरित भागात पाईपलाईन टाकण्यासाठी एचपी ऑईल कंपनीने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे.
त्यांनतर संपूर्ण शहरात गॅस पाईपलाईनचे (gas pipeline) काम केले जाणार आहे. केंद्र सरकारने नागरिकांना सुरक्षित गॅस उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आखली असून सुरुवात देखील केली आहे.
केंद्राने दाभोळ ते बंगळूर अशी मोठी पाईपलाईन योजना आखली होती. बंगळूरला जाणारी पाईपलाईन कोल्हापूरजवळून जाते. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथे या योजनेचे मुख्य केंद्र आहे.
तेथूनच कोल्हापूरसाठी कनेक्शन (connection) मिळाले आहे. मुक्तसैनिक वसाहतमध्ये या योजनेतून पुरवठा सुरू झाला आहे. 500 कुटुंबांकडून त्याचा वापर केला जात आहे.
24 सप्टेंबरपर्यंत 'या' लोकांच्या धनात होणार प्रचंड वाढ; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
सीएनजी गॅस पंपाचीही सुविधा
वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी शहरात 4 ठिकाणी सीएनजी गॅस (cng gas) पंप सुरू केले आहेत. नागरिकांना कमी पैशांत म्हणजेच 94 रुपयांत 1 किलो गॅस मिळणार आहे. शहरातील वाशी नाका, राजारामपुरी, शिवाजी उद्यमनगर, देवकर पाणंद येथे हे पंप सुरू करण्याचे काम सुरू आहे.
या ठिकाणी गॅस पुरवठा सुरू होणार
पहिल्या टप्प्यात नागाळा पार्क, ताराबाई पार्क, जाधववाडी, मुक्तसैनिक वसाहत, मार्केट यार्ड, रूईकर कॉलनी, रुक्मिणीनगर, कदमवाडी, पाटोळेवाडी, सर्किट हाऊस परिसर, राजारामपुरी, शिवाजी पार्क, शाहूपुरी या ई वॉर्ड परिसरात पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. आता गॅसपुरवठा सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
हृदयविकाराचा झटका साधारणपर्यंत किती वेळा येऊ शकतो? जाणून घ्या सविस्तर
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीन दरात होणार 1 हजार रुपयांनी वाढ
एलआयसीने लॉन्च केली नवीन पॉलिसी योजना; आयुष्यभर पेन्शनचा मिळणार 'इतका' लाभ
Share your comments