1. कृषीपीडिया

शेतकरी मित्रांनो 'या' फुलाची लागवड करून ३० वर्षांपर्यंत घ्या कमाई; मिळेल चांगला नफा

शेतकरी नवनवीन पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न घेत असतात. आपण आज अशाच एका फुलाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्या फुलांच्या प्रत्येक भागातून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
planting flower

planting flower

शेतकरी नवनवीन पिकांची लागवड (planting flower) करून चांगले उत्पन्न घेत असतात. आपण आज अशाच एका फुलाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्या फुलांच्या प्रत्येक भागातून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.

पालाश फूल लागवड

आपण पाहिले तर पळस फुल (palas flower) वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. परसा, धक, तेसू, किषक, सुपका, ब्रह्मवृक्ष आणि वनाची ज्योत अशा शब्दांनी ओळखले जाते.

मात्र, गेल्या काही वर्षांत या फुलाच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. मात्र तरीही याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. पळस (palas) हे उत्तर प्रदेशचे राज्य फूल देखील आहे. या फुलाच्या प्रत्येक भागातून चांगला नफा मिळू शकतो.

जीवन पॉलिसीमध्ये जमा करा महिना फक्त 794 रुपये आणि मिळवा 5 लाखांचा नफा

या ठिकाणी केली जाते लागवड

झारखंड, दक्षिण भारत, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात पळस फुलाची सर्वाधिक लागवड केली जाते. त्याची पाने, साल, मूळ आणि लाकूड यांचा वापर विविध सेंद्रिय उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. त्याची पावडर आणि तेलही बाजारात चांगल्या किमतीत विकले जाते. पळस वृक्ष एकदा लावल्यानंतर 40 वर्षे जिवंत राहतो.

आनंदाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या योजनेत घरी बसून करा गुंतवणूक, मिळणार 'इतका' लाभ

चांगला नफा मिळवा

शेतकर्‍यांना हवे असल्यास पळस झाडे लावून 30 वर्षांहून अधिक काळ नफा कमावता येतो. याशिवाय (planting) भाजीपाल्याची आंतरशेती करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. एका एकरात पळसाची ३२०० झाडे लावता येतात. त्याची रोपे कोणत्याही प्रमाणित नर्सरीमधून खरेदी करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
मिरचीच्या दरात घट तर टोमॅटोच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ; जाणून घ्या आजचे बाजारभाव
मासिक पाळी अनियमित येण्याची 'ही' आहेत कारणे; जाणून घ्या सविस्तर
गोबरगॅसवर शेतकऱ्यांना दिले जाते 'इतके' अनुदान; घ्या असा लाभ

English Summary: Farmer get income 30 years planting flower Published on: 05 September 2022, 06:05 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters