1. सरकारी योजना

गोबरगॅसवर शेतकऱ्यांना दिले जाते 'इतके' अनुदान; घ्या असा लाभ

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. केंद्र सरकारची राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम योजना ही देखील अशीक एक योजना आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Farmer friends

Farmer friends

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. केंद्र सरकारची राष्ट्रीय बायोगॅस (biogas) व खत व्यवस्थापन कार्यक्रम योजना ही देखील अशीक एक योजना आहे.

केंद्र सरकारतर्फे (central government) मागील अनेक दशकांपासून राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम (National Biogas and Fertilizer Management Program) याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.

या योजनेअंतर्गत तुम्ही घरबसल्या गोबरगॅस तयार करून त्याचा वापर आपल्या स्वयंपाकघरात करू शकता. जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला खऱ्या अर्थाने गतीमिळेल.

आता मोफत रेशन मिळणार की नाही? केंद्र सरकार याबाबत घेणार मोठा निर्णय

महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागात बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत (cooking fuel and organic manure) पुरविणे हा या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे.

केंद्र शासनाने राज्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन जिल्हानिहाय उद्दिष्टाचे वाटप केले जाते. अशा पद्धतीने पर्यावरण पूरक अशी ही एक महत्वाची योजना आहे.

गौरी विसर्जन कसे करावे? जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त

लाभ घेण्यासाठी येथे संपर्क साधा

जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आणि तालुका स्तरावर पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी / कृषी अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याकडे किंवा आपल्याच ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे संपर्क साधा.

केंद्र शासनाच्या (central government) नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत राबविली ही योजना राबविली जाते. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 9,000 रुपये, अनुसूचित जाती व जमाती यामधील लाभार्थी यांच्यासाठी 11,000 रुपये अनुदान दिले जाते.

महत्वाच्या बातम्या 
आनंदाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या योजनेत घरी बसून करा गुंतवणूक, मिळणार 'इतका' लाभ
जीवन पॉलिसीमध्ये जमा करा महिना फक्त 794 रुपये आणि मिळवा 5 लाखांचा नफा
रिस्क घ्या, चांगला नफा नक्की होईल; जाणून घ्या राशीभविष्यनुसार बिझनेस

English Summary: Farmer friends getting subsidy Gobargas subsidy Published on: 05 September 2022, 03:01 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters