1. बाजारभाव

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीन दरात होणार 1 हजार रुपयांनी वाढ

महाराष्ट्रातील बरेच शेतकरी सोयाबीन पिकाची लागवड करतात. अशा ठराविक एक दोन पिकांवर अवलंबून शेतकरी आपले जीवनमान चालवत असतात. मात्र सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन दरात आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Soybean price increase

Soybean price increase

महाराष्ट्रातील बरेच शेतकरी सोयाबीन पिकाची लागवड करतात. अशा ठराविक एक दोन पिकांवर अवलंबून शेतकरी आपले जीवनमान चालवत असतात. मात्र सध्या सोयाबीन (soyabean) उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन दरात आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

सध्या सोयबिनची आवक कमी असूनही सोयाबीनचे दर कमी झाले आहेत. सध्या सोयाबीन पिके (soyabean crops) तणमुक्त आहेत आणि कोणत्याही कीड किंवा रोगांचा हल्ला झालेला नाही. मात्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही जिल्हे जास्त आणि संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे काहीसे नुकसान देखील झाले आहे.

मिरचीच्या दरात घट तर टोमॅटोच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ; जाणून घ्या आजचे बाजारभाव

आपण पाहिले तर या भागात पीक आणि उत्पन्नालाही फटका बसतो. पिवळा मोझॅक (Yellow mosaic) हा कोणत्याही राज्यात मोठा चिंतेचा विषय नाही. सप्टेंबरमध्ये हवामान अनुकूल राहिले आणि हवामानात अचानक आणि लक्षणीय बदल न झाल्यामुळे यावर्षी सोयाबीनचे पीक चांगले जोमात आहे.

शेतकरी मित्रांनो 'या' फुलाची लागवड करून ३० वर्षांपर्यंत घ्या कमाई; मिळेल चांगला नफा

कीर्ती प्लांटच्या (Kirti Plant) किमतीने 6300 चा आधार तोडला तेव्हापासून घसरण वाढली आहे. ग तवर्षी नवीन पिकाची आवक होऊनही सोयाबीनचा भाव 5250 ते 8000 पर्यंत वाढला होता. मागील वर्षी कॅरी फॉरवर्ड स्टॉक (Carry forward stock) नसल्याने नवीन पिकाची मागणी चांगली होती.

माहितीनुसार या हंगामातही सोयाबीनच्या भावात 1000 रुपयांनी निश्चितच वाढ होणार आहे. विशेष म्हणजे 1000/1500 वाढत्या आवकवर किंमत आणखी 400/500 रुपयांच्या वर गेली तर नवीन खरेदीही मोठ्या प्रमाणात होईल.

महत्वाच्या बातम्या 
एलआयसीने लॉन्‍च केली नवीन पॉलिसी योजना; आयुष्यभर पेन्शनचा मिळणार 'इतका' लाभ
24 सप्टेंबरपर्यंत 'या' लोकांच्या धनात होणार प्रचंड वाढ; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
आनंदाची बातमी: शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी सरकार देतंय 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान

English Summary: Good news farmers Soybean price increase Published on: 07 September 2022, 10:30 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters