1. सरकारी योजना

Ujwala Yojana Breaking: एलपीजी गॅस सिलेंडर 200 रुपयांनी होणार स्वस्त, केंद्र सरकारची मोठी घोषणा

सध्या पेट्रोल आणि डिझेल यांचे दर गगनाला पोहोचले असताना केंद्र सरकारने त्यामध्ये कपात केल्याने सर्वसामान्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
announcement about gas cyllinder price

announcement about gas cyllinder price

सध्या पेट्रोल आणि डिझेल यांचे दर गगनाला पोहोचले असताना  केंद्र सरकारने त्यामध्ये कपात केल्याने सर्वसामान्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळणार आहे.

त्यासोबतच सीएनजी गॅस असो की स्वयंपाक घरातील एलपीजी गॅस यांच्याही किमती खूप वाढल्या आहेत. स्वयंपाकाचा गॅस तर एक हजाराच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर  गॅस दरवाढीची झळ बसत असताना केंद्र सरकारनेएक मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून आता स्वयंपाक घरातील एलपीजी गॅस दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे.याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली.1000 चा टप्पा पार केलेला गॅस सिलेंडर आता उज्ज्वला योजना अंतर्गतदोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे.

त्यामुळे स्वयंपाक घराचेबजेट आता पूर्वपदावर येण्यास थोडीफार मदत होणार आहे.तसेच सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला देखील दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून पेट्रोल साडेनऊ तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त होणार आहे अशी घोषणा सीतारमण यांनी केली. इंधनावरील अबकारी कर कमी केला जाणार आहे व हा दर कमी केल्यानंतर पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे. प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना प्रत्येक गॅस सिलेंडर दोनशे रुपयांची  ( बारा सिलेंडर साठी)

अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असूनयाचा फायदा तब्बल दोन कोटींहून अधिक लोकांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.त्यामुळे महागाईमुळे त्रस्त जनतेला दिलासा मिळणार आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:त्या' लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द!! सरकारकडून मोठी घोषणा, वाचा नवीन नियम

नक्की वाचा:Neelgiri Cultivation: 'या' झाडाची लागवड करून अवघ्या 5 वर्षात कमवा 70 लाखांचे उत्पन्न; एकदा वाचाच

नक्की वाचा:खरं काय! 'या' राज्याची सरकार गाय पालणासाठी देणार 10 हजार 800 रुपये

English Summary: lps domestic gas cyllinder chep by two hundread rupees that announcement by central goverment Published on: 22 May 2022, 10:35 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters