1. कृषीपीडिया

Neelgiri Cultivation: 'या' झाडाची लागवड करून अवघ्या 5 वर्षात कमवा 70 लाखांचे उत्पन्न; एकदा वाचाच

शेतकरी बांधव काळाच्या ओघात शेती व्यवसायात मोठा अमूलाग्र बदल करत आहेत. आता शेतकरी बांधव पीकपद्धतीत मोठा बदल करीत आहेत. विशेष म्हणजे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा तसेच पीक पद्धतीत बदल करण्याचा तसेच मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड करण्याचा सल्ला देत असतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Nilgiri Plantation

Nilgiri Plantation

शेतकरी बांधव काळाच्या ओघात शेती व्यवसायात मोठा अमूलाग्र बदल करत आहेत. आता शेतकरी बांधव पीकपद्धतीत मोठा बदल करीत आहेत. विशेष म्हणजे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा तसेच पीक पद्धतीत बदल करण्याचा तसेच मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड करण्याचा सल्ला देत असतात.

शेतकरी बांधव देखील आता बदलत्या काळानुसार शेतीव्यवसाय बदल स्वीकारीत आहेत. हा बदल शेतकऱ्यांना फायद्याचा देखील सिद्ध होत आहे. अलीकडे आपल्या देशातील शेतकरी बांधव  वेगवेगळ्या झाडांची व्यावसायिक स्तरावर शेती करू लागले आहेत.

यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. आज आपण देखील एका अशा झाडाच्या शेतीविषयी जाणून घेणार आहोत ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधव केवळ पाच वर्षात 70 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवू शकतात. मित्रानो आम्ही ज्या झाडाच्या लागवडी बद्दल बोलत आहोत ते झाड आहे निलगिरीचे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया निलगिरी शेती विषयक बहुमूल्य माहिती.

Pm Kisan Yojana: पीएम किसानच्या वेबसाईटवर आली 'ही' महत्वाची माहिती; माहितीत नेमकं दडलंय काय?

निलगिरीच्या शेतीसाठी योग्य हवामान नेमकं कोणतं 

मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते भारतीय हवामान निलगिरीच्या शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. भारतातील कोणत्याही प्रदेशातील हवामान निलगिरी लागवडीसाठी अनुकूल आहे. अर्थातच याची लागवड आपल्या महाराष्ट्रात ही केली जाऊ शकते.

आपल्या भारतातील डोंगराळ प्रदेश असो किंवा मैदानी भाग असो, सर्वत्र या झाडाची शेती सहज शक्य आहे.  विशेष म्हणजे या झाडाच्या लागवडीला हवामान बदलाचाही फारसा काही फरक पडत नाही यामुळे हे एक खात्रीशीर उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून ओळखले जाते. कृषी क्षेत्रातील तज्ञांच्या मते, एक हेक्टर क्षेत्रात तीन हजार नीलगिरीची रोपे लावली जाऊ शकतात.

Mansoon 2022: मान्सून संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी; या तारखेला मान्सून येणार महाराष्ट्रात; वाचा

खरं पाहता बाजारात या झाडाची रोपे सहज उपलब्ध होतात. यामुळे रोपे खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांना फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. मित्रांनो बाजारात निलगिरीची रोपे त्याची 8 रुपय नग या दराने सहज विकत घेता येतात.

शेतकरी बांधवांना जर निलगिरीची एका एकरात लागवड करायची असेल तर त्यांना सुमारे 30 हजार रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. म्हणजेच केवळ 30 हजारांची गुंतवणूक करून लाखोंचा नफा शेतकरी बांधव यांच्या शेतीतून कमवू शकतो.

ऐकावे ते नवलंच! एकाच झाडाला लागणार टोमॅटो आणि बटाटे; वाचा या नवीन टेक्निकविषयी

70 लाखांपर्यंत नफा सहज मिळवता येईल 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, निलगिरीचे लाकूड बाजारात कायम मागणी मध्ये असते. या लाकडाचा वापर बॉक्स, इंधन, हार्ड बोर्ड, फर्निचर आणि पार्टिकल बोर्ड इत्यादी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. 

खरं पाहता याचे झाड केवळ 5 वर्षातच चांगले वाढते. म्हणजे 5 वर्षानंतर याच्या झाडाचे लाकूड विक्रीसाठी पाठवता येते. पूर्ण विकसित झाल्यानंतर याच्या एका झाडापासून सुमारे 400 किलो लाकूड मिळते. बाजारात निलगिरीचे लाकूड 6 ते 7 रुपये किलोने विकले जाते. अशा परिस्थितीत एका हेक्टरमध्ये तीन हजार झाडे लावली तर शेतकरी बांधव आरामात 72 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकतात.

English Summary: Neelgiri Cultivation: Earn 70 lakhs in just 5 years by planting 'Ya' tree; Read once Published on: 21 May 2022, 11:11 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters