1. सरकारी योजना

Agricultural Business: कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडून इंजिनिअरींगचा तरुण शेतात कमवतोय लाखों रुपये

चांगले शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. तर काहींना नोकरीत मन रमत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची मुले शेतीकडे वळत असताना पाहायला मिळतात. बऱ्याच तरुणांनी शेतीमधून लाखों रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. अशीच एक कौतुकास्पद बातमी समोर आली आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
earning lakhs rupees

earning lakhs rupees

चांगले शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. तर काहींना नोकरीत मन रमत नाही. अशा परिस्थितीत तरुण शेतीकडे (farming) वळत असताना पाहायला मिळतात. बऱ्याच तरुणांनी शेतीमधून लाखों रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. अशीच एक कौतुकास्पद बातमी समोर आली आहे.

इंजिनिअरींगच्या (Engineering) एका तरुणाने लाखों रुपये पगार असलेली कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडून शेतीला प्राधान्य दिले आहे. नोकरी सोडून लाखों रुपयांची कमाई त्याने केली आहे. या शेतीला त्याने व्यवसायाचे स्वरुप देत आठ जिल्ह्यांमध्ये विस्तार केला आहे.

सावधान! सरकारला फसवून रेशन घेणाऱ्या लोकांवर होणार कारवाई

अंशुल मिश्रा हे त्या तरुणाचे नाव असून अंशुलच्या या कामाचे कौतूक संपूर्ण राज्यात होत आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील अंशुलने चेन्नईहून इंजिनिअरींगचे शिक्षण (Engineering education) पूर्ण केले. यानंतर त्याने नोकरीच्या मागे न धावता गावात ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यास सुरुवात केली.

अंशुलने इंजिनीअरिंगच्या अभ्यासादरम्यान यूट्यूबवर ड्रॅगनची लागवड (Cultivation Dragon) करण्याच्या पद्धती आणि फायदे जाणून घेतल्या. त्यामुळे त्याने आपल्या ओसाड जमिनीवर ड्रॅगन फार्मिंगचा यशस्वी प्रयोग केला.

मांस उत्पादनासाठी माडग्याळ मेंढीची जात प्रसिद्ध; पालनाने शेतकरी होणार श्रीमंत

ड्रॅगन फ्रुट लागवडीमध्ये (Cultivation of dragon fruit) एकदाच खर्च लावून हे पीक ३५ वर्षे सतत काढता येते. ड्रॅगन पिकाची आणखी एक खासियत म्हणजे वर्षातून ७ वेळा पीक घेऊन भरपूर नफा मिळवता येतो.

स्वत: शेती करुन उत्पादन घेत असतांना अंशुल ओसाड जमिनीवर ड्रॅगन फळाची लागवड करून शेतकर्‍यांना प्रोत्साहन देत आहे. यासोबत ड्रॅगनची रोपटी तयार करून इतर शेतकर्‍यांना विकून नफा कमावत आहेत.

महत्वाच्या बातम्या 
शेतकरी मित्रांनो 'या' औषधी पिकाची फक्त 10 रोपे लावा आणि मिळवा 20 लाखापर्यंत उत्पन्न
अपघाती विमा योजनेत फक्त 299 रुपये गुंतवा आणि मिळवा 10 लाखांचा फायदा
कृषी अभियांत्रिकी करून मिळवा सरकारी नोकरी; महिना 50 ते 70 हजार रुपये मिळतो पगार

English Summary: Leaving job corporate company earning lakhs rupees farm Published on: 18 September 2022, 04:15 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters