1. शिक्षण

कृषी अभियांत्रिकी करून मिळवा सरकारी नोकरी; महिना 50 ते 70 हजार रुपये मिळतो पगार

कृषी क्षेत्र हे आजच्या युगात रोजगाराचे खूप मोठे साधन आहे, विशेषत: कृषी अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तरुणांना याचा चांगला फायदा होऊ शकतो. आज आपण याविषयी महत्वाची माहिती घेणार आहोत.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Agricultural Engineering

Agricultural Engineering

कृषी क्षेत्र हे आजच्या युगात रोजगाराचे खूप मोठे साधन आहे, विशेषत: कृषी अभियांत्रिकी (Agricultural Engineering) शिक्षण घेणाऱ्या तरुणांना याचा चांगला फायदा होऊ शकतो. आज आपण याविषयी महत्वाची माहिती घेणार आहोत.

महत्वाचे म्हणजे कृषी अभियांत्रिकी ही अभियांत्रिकीची शाखा आहे, जी कृषी क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या कृषी उपकरणे (Agricultural equipment) आणि यंत्रांचे उत्पादन, डिझाइन आणि सुधारणेशी संबंधित आहे.

कृषी अभियंत्यांची प्रमुख भूमिका म्हणजे उत्तम अभियांत्रिकी (Engineering) पद्धती, शोध, तंत्रज्ञान आणि उपकरणे यांच्याद्वारे कृषी उत्पादनात सुधारणा करणे ज्यामुळे चांगले पीक उत्पादन आणि शेतीमध्ये चांगले उत्पन्न मिळते.

सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य

पारंपारिक शेती पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याची आवड असलेल्या उमेदवारांनी हे क्षेत्र नक्कीच निवडावे. येत्या काही वर्षांत कृषी अभियंत्यांच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

करिअर पर्याय काय आहे

कृषी अभियंत्यांसाठी सरकारी (government) संस्थांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. सध्या खाजगी क्षेत्र देखील कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी मोठ्या प्रमाणात कृषी अभियंत्यांना नोकऱ्या देत आहे.

कृषी क्षेत्रातील B.Tech आणि M.Tech विद्यार्थी राज्य सरकार, अन्न आणि प्रक्रिया विभाग, संशोधन विभाग आणि इतर अनेक क्षेत्रात कृषी विकासासाठी निर्माण केलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.

हाडांना भरपूर कॅल्शियम देणारे हे पदार्थ दररोज खा; हाडं होतील मजबूत

पगार इतका मिळेल

या क्षेत्रात विद्यार्थ्यांना अनुभवानुसार सरकारी संस्थेत या नोकरीचा पगार (salary) 50 ते 70 हजार रुपये प्रति महिना सुरू होतो.

महत्वाच्या बातम्या 
मांस उत्पादनासाठी माडग्याळ मेंढीची जात प्रसिद्ध; पालनाने शेतकरी होणार श्रीमंत
सावधान! सरकारला फसवून रेशन घेणाऱ्या लोकांवर होणार कारवाई
LIC च्या जीवन सरल योजनेत दरवर्षी मिळणार ५२ हजार रुपये; घ्या असा लाभ

English Summary: Make Career Agricultural Engineering Salary 50 to 70 thousand Published on: 18 September 2022, 01:57 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters