1. इतर बातम्या

Today Horoscope: सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य

आज कृतिका नक्षत्र आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असेल. वृषभ राशीच्या लोकांना आज आर्थिक फायदा होऊ शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

आज कृतिका नक्षत्र आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असेल. वृषभ राशीच्या लोकांना आज आर्थिक फायदा होऊ शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. शारीरिक आणि मानसिक (physical and mental) आरोग्यही चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र, प्रियजनांशी गोड बोलाल. दुपारनंतर आरोग्यात बदल होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद निर्माण होऊ शकतात.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य असेल. व्यवसाय करणारे लोक आज आत्मविश्वासाने परिपूर्ण असल्यामुळे त्यांना भरपूर पैसे मिळतील. सरकारी नोकरीत असणाऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो.

स्वतःसाठी थोडा वेळ काढाल आणि काही महत्त्वाच्या गोष्टी खरेदी देखील करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला तुमचा हेवा वाटू शकतो.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांनो बोलण्यात संयम ठेवा. नव्या नोकरीच्या संधी मिळू शकतात. मित्रांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. संपत्ती कमी होईल. भाऊ-बहिणीच्या सहकार्याने व्यवसायात वाढ होऊ शकते. मनःशांती असेल, पण नकारात्मकतेचा प्रभावही असू शकतो. एखाद्या मित्राच्या मदतीने प्रॉपर्टीमध्ये (Property) गुंतवणूक करू शकता.

कर्क

कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. कोणतीही प्रलंबित कामे पूर्ण होतील. मनात आत्मविश्वास राहील. पण, अतिराग करणे टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात वाढ होईल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. शैक्षणिक स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांचा कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रात (Professional sector) आजचा दिवस चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी आवश्यक चर्चा होण्यास थोडा वेळ लागेल. कामाचा ताण वाढल्यामुळे तब्येत थोडीशी सुस्त राहील. प्रवास किंवा पर्यटनाचे आयोजन केले जाईल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.

शेतकऱ्यांनो येत्या 10 दिवसात जनावरांचा तातडीने विमा उतरवावा; राजू शेट्टींची मागणी

कन्या

सावधान कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही समस्या घेऊन येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या काही समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल. विरोधक आज तुमच्या कामात अडथळे आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल. आज तुम्हाला धावपळ करावी लागेल, तरच यश येताना दिसत आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आळसाचा असेल. बोलण्यात उग्रपणा दिसून येईल. कुटुंबाच्या सहकार्याने व्यवसायात वाढ होऊ शकते. प्रलंबित कामे पूर्ण होतील. मन प्रसन्न राहील. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक

आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम घेऊन येईल. आर्थिक परिस्थितीची चिंता आज संपेल. कामाच्या ठिकाणी मन प्रसन्न राहील आणि तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. काही लोकांना नव्या नोकरीची ऑफरही मिळू शकते.

धनु

आज तुम्हाला अनेक दिवसांपासून व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबासोबत प्रवासाचे योगही आहेत. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. भौतिक सुखांमध्ये वाढ होऊ शकते. लाभाच्या संधी मिळतील. संयमाचा अभाव राहील. स्वावलंबी व्हा.

पितृ पक्षा दरम्यान कावळ्यांना अन्न का दिले जाते? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि कथा

मकर

मकर राशीची लोक आज मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि गोंधळलेले असतील. कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही तणावाखाली राहाल. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. निराशाचे भावना मनात येईल. कुटुंबातील सदस्यांच्या चिंता सतावेल. घरातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडू शकते. तुम्ही शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला जाईल. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात. खर्चही वाढतील. नोकरीत अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल.

मीन

आज कुटुंबातील वाद आणि दुरावा मिटेल. काही नवीन काम सुरू केले, तर त्याचा लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. त्यांच्यावर अधिकाऱ्यांची कृपा राहील. आज कोणतेही महत्त्वाचे काम पुढे ढकलणे टाळावे लागेल, अन्यथा ते तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते.

महत्वाच्या बातम्या 
अरे व्वा! फळमाशीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शेतकऱ्याने केला भन्नाट जुगाड
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! फक्त 417 रुपये गुंतवा आणि मिळवा 1 कोटी रुपये
शेतकऱ्यांनो मेथीच्या 'या' वाणांची शेती करा; 50 हजार रुपयांपर्यंत मिळेल उत्पन्न

English Summary: people all zodiac signs Read today's horoscope Published on: 16 September 2022, 05:34 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters