1. फलोत्पादन

रोपवाटिका सुरू करायची, तर मग ही माहिती तुमच्या उपयोगाची आहे!

आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी पिकांची कलमे आणि भाजीपाला किंवा इतर तत्सम पिकांची रोपांची निर्मिती केली जाते. या जागेचे रोपवाटिका असे म्हणतात.यामध्ये तयार केलेला कलमांची आणि रोपांची शास्त्रशुद्ध दृष्ट्या काळजी घेतली जाणे अपेक्षित असते. रूपांची वेगवेगळ्या प्रकारे अभिवृद्धी करणे, तयार केलेल्या रूपांची काही काळापर्यंत योग्यप्रकारे जोपासना करणे आणि अशा रोपांचा आणि कलमांचा पुरवठा करणे अशा तीन प्रकारच्या जबाबदाऱ्या या माध्यमातून सांभाळले जातात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
nursury

nursury

आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी पिकांची कलमे आणि भाजीपाला किंवा इतर तत्सम पिकांची रोपांची निर्मिती केली जाते. या जागेचे रोपवाटिका असे म्हणतात.यामध्ये तयार केलेला कलमांची आणि रोपांची शास्त्रशुद्ध दृष्ट्या काळजी घेतली जाणे अपेक्षित असते. रूपांची वेगवेगळ्या प्रकारे अभिवृद्धी करणे, तयार केलेल्या रूपांची काही काळापर्यंत योग्यप्रकारे जोपासना करणे आणि अशा रोपांचा  आणि कलमांचा पुरवठा करणे अशा तीन प्रकारच्या जबाबदाऱ्या या माध्यमातून सांभाळले जातात.

 

 रोपवाटिका विविध प्रकार

  • शासकीय रोपवाटिका
  • कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका
  • मान्यताप्राप्त संस्थेच्या रोपवाटिका
  • मान्यताप्राप्त आणि पंजिकृत खाजगी रोपवाटिका

 पिकांच्या वर्गीकरणवरून रोपवाटिकेचे प्रकार

  • फळझाडांची रोपवाटिका
  • भाजीपाल्याचे रोपवाटिका
  • औषधी वनस्पतीच्या रोपवाटिका
  • वर शेती पिकांची रोपवाटिका
  • फक्त बी बियाणे
  • फक्त रोपांची रोपवाटिका
  • फक्त कलमांची रोपवाटिका
  • दुसरीकडून कलमे व रोपे आणून त्यांची फक्त विक्री करणे इत्यादी.

 रोपवाटिकेचे महत्त्व

 फलोत्पादन म्हणजे निश्चित व श्वाश्वत उत्पादन देणारे क्षेत्र म्हणून  शेतकऱ्यांचा दृष्टिकोण आहे. कोरडवाहू क्षेत्रात तृणधान्य पिकांच्या उत्पादन याची शाश्वती राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळून त्यांच्यात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे फलोत्पादन यामुळे शक्य झाले आहे. महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या  जमिनी व हवामानाची विविधता यामुळे फळबागांसाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ज्या भागात ज्या फळपिकांना वाव आहे त्या भागात त्या फळपिकांच्या रोपवाटीकांची निर्माण करणे अत्यंत गरजेचे असते. कारण फळबागा चा यशस्वीतेचे सगळे गमक हे जातिवंत कलमे किंवा रोपे याच्यात दडलेले आहे. म्हणून विविध प्रकारची शुद्ध व जातिवंत कलमे रोपवाटिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने  रोपवाटीका तयार करणे गरजेचे आहे..

 

रोपवाटिकेची सुरुवात वाकडी कशी करावी?

फळबागांच्या विकासामध्ये रोपवाटिकेचा महत्त्वाचा वाटा असतो. यशस्वी रोपवाटिका उभारण्यासाठी त्यांचे योग्य नियोजन करावे लागते.रोपवाटिकेची उभारणी करताना तिचा प्रकार वकोणत्या ठिकाणी उभारणी करायची या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. प्रथम रोपवाटिका उभारण्याचे अगोदर रोपवाटिकेचा प्रकार निश्चित करा. शासन मान्यताप्राप्त रोपवाटिका की खाजगी रोपवाटिका तसेच कोणत्या प्रकारचे कलमी किंवा रोपे तयार करायचे आहेत हे प्रथम ठरवा. ज्या भागात रोपवाटिका सुरू करायची आहे त्या भागातील भौगोलिक परिस्थिती, तिथले पीकपद्धती,दळणवळणाच्या सोयी, कच्चामाल, मजूर या संबंधी माहिती घ्यावी .अगोदर व्यवस्थित अभ्यास करावा. इतर रोपवाटिका यांचा व्यवस्थित सर्वे करावा. तसेच रोपवाटिका बद्दल असलेले सर्व नियम व तिच्यातील आर्थिक गुपिते यांचा बारकाईने अभ्यास करावा. ( स्त्रोत- कृषी सम्राट)

 

English Summary: starting of nursury important information Published on: 14 September 2021, 10:10 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters