आता बटाट्याच्या रोपाच्या पानाचा फोटो तुम्हाला बटाट्यावरील रोगाबद्दल माहिती देईल. आयआयटी मंडी केंद्रीय बटाटा अनुसंधान केंद्र सिमला येथील संशोधकांनी एक ॲप तयार केले आहे.
याद्वारे बटाट्याच्या रोपाचा एक फोटो काढल्यानंतर लगेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स च्या माध्यमातून बटाट्याच्या रोपांवर रोग आहे की नाही याबद्दल माहिती मिळू शकते. केंद्रीय कृषी मंत्रालयानेया मोबाईल ॲपच्या ट्रायलला मंजुरी दिली आहे.सर्वसामान्यपणेबटाट्याच्या पिकावर ब्लाईट म्हणजेच झुलसा रोग मोठ्या प्रमाणात असतो. जर वेळेवर याचा प्रादुर्भाव थांबवला नाही तर एका आठवड्यात पूर्ण पीक खराब होते. याची तपासणी आणि माहिती करण्यासाठी तज्ञांना शेतामध्ये जावे लागते. अगदी सूक्ष्म निरीक्षणाद्वारे या रोगाची माहिती मिळते. परंतु आता या नवीन तंत्रज्ञानाने फक्त पानाचा फोटो काढल्यानंतर रोगाबद्दल माहिती मिळू शकते.याअगोदर संशोधकांनी जटिल असे कंपुटेशन मोडेल च्या मदतीने एक कम्प्युटर ॲप तयार केले होते. परंतु हे ॲप जास्त एमबीचे असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हवा तेवढा त्याचा फायदा मिळाला नव्हता. परंतु आता आयआयटी च्या टीमनेयाच कम्प्युटर अॅप ला स्मार्टफोन च्या क्षमतेनुसार उपलब्ध केले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ट्रायलला मंजुरी दिली आहे
त्यानंतर अगदी सहजतेने शेतकऱ्यांसाठी हे ॲप उपलब्ध केले जाणार आहे. पूर्ण देशात या मॉडेलचा उपयोग होईल यावर विशेष भर देण्यात येत आहे. जर भारतात बटाट्याच्या लागवड क्षेत्राचा विचार केला तर 2.4 लाख हेक्टर क्षेत्रावर बटाट्याची लागवड केली जाते व वार्षिक उत्पादन 24 लाख टनांच्या आसपास आहे. परंतु लाईट रोगामुळे 20 ते 30 टक्के उत्पादन प्रभावित होते. त्यामुळे शेतकऱ्यांना फारच मोठा आर्थिक फटका बसतो. या संशोधनामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी द्वारे पानांच्या रोगग्रस्त भागाची माहिती करणे सोपे होणार आहे.
कसे काम करते हे ॲप?
या ॲपच्या माध्यमातून रोगग्रस्त दिसणाऱ्या पानाचा फोटो घेतला जातो त्यानंतर रिअल टाईम मध्ये हे ॲप रोगाबद्दलची माहिती कन्फर्म करतो.
त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी वेळेत रोका बद्दलची माहिती मिळेल व वेळेत त्याचा अटकाव करण्यात येईल व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल.
महत्वाच्या बातम्या
Share your comments