1. बातम्या

महिलांसाठी राखीव कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी 'लक्ष्मी' योजनेत महिलांचे नाव सातबाऱ्यावर लावा- कृषीमंत्री दादाजी भुसे

सध्या आपल्याला माहित आहेच की, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. कुठलेही क्षेत्र नाही की त्यामध्ये महिला नाहीत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
if you get benifit to goverment scheme so indicate women name in saatbaara by laxmi yojna

if you get benifit to goverment scheme so indicate women name in saatbaara by laxmi yojna

सध्या आपल्याला माहित आहेच की, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. कुठलेही क्षेत्र नाही की त्यामध्ये महिला नाहीत.

तसेच कृषी क्षेत्राचा जर विचार केला तर या क्षेत्रामध्ये तर महिलांचा सहभाग हा अगदी पूर्वापार आहे. परंतु आता महिलांच्या सहभागाची  सक्रियता आणि महत्त्व वाढविण्याच्या उद्देशाने शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून  कृषी क्षेत्रामध्ये ज्या विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात अशा योजना आता महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि महिलांचा सन्मान करता यावा यासाठी शासनाच्या लक्ष्मी योजनेत  जमिनीच्या सातबार्‍यावर महिलांचे नाव लावावे, असे आवाहन राज्याचे कृषि तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. कृषिमंत्री दादाजी भुसे हे धनवंतरी सभागृह शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी इमारत, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे आयोजित महिला शेतकरी परिसंवाद व आत्मा प्रकल्पात जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण काम करणारे शेतकरी व शेतकरी गट पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमातबोलत होते.

यावर बोलताना पुढे दादाजी भुसे म्हणाले की, जर आपण वीस वर्षाचा विचार केला तरतेव्हा कृषी क्षेत्रात नगण्य असणाऱ्या महिलांचे प्रमाण आता खूप वाढताना दिसत आहे.तसेच कृषी क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी कृषी महाविद्यालयांमध्ये देखील महिलांचे प्रमाण वाढत आहे. परंतु केवळ 14 टक्के महिलांच्या नावावर शेती असल्याने बँकेचे कर्ज, विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर महिलांचे नाव सातबाऱ्यावर लावावे असे कृषिमंत्री भुसे यांनी म्हटले.

 पोखरा योजनेमध्ये कृषी मित्र ऐवजी कृषी ताई यांची नेमणूक

 महिला मजुरांना  अगदी कमी वेळेमध्ये चांगले काम करता यावे यासाठी विशेष प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे तसेच हळद, कापूस वेचताना महिला शेतमजुरांना हाताला जखमा होऊ नयेत यासाठी हातात मोजे व शास्त्रोक्‍त पद्धतीने तयार केलेली पिशवी देण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत. शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी पोखरा योजनेमध्ये  चार हजार गावांमध्ये कृषिमित्र ऐवजी कृषी ताई ची नेमणूक केली असल्याचे देखील कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. दोन वर्षापासून कोरोना संकटाला सामोरे जाताना सर्वव्यवहार बंद होते परंतु शेती सुरू होती.

शेतकऱ्यांच्या कष्टाने एवढ्या कठीण काळात देखीलभाजीपाला,धान्य किंवा दुधाची कमतरता कोणालाही जाणवली नाही.यामुळे शेतकरी राजा कणा आहेच परंतु अन्न देवताही असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:-कॉमर्स क्षेत्रात भारत सरकारची पावले,वाचा सविस्तर

नक्की वाचा:मर रोगाला फुकटचे आमंत्रण! मर रोग नैसर्गिक क्रिया नाही तर मानवनिर्मित क्रिया

नक्की वाचा:नवीन वाण विकसित! गोल्डन ॲडव्हान्स हे धानाचे नवीन वाण देईल 55 क्विंटल एकरी उत्पादन

English Summary: if you get benifit to goverment scheme so indicate women name in saatbaara by laxmi yojna Published on: 02 May 2022, 10:27 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters