1. बातम्या

Farmer Award : नाशिक मध्ये बळीराजाचा होणार सन्मान; राज्यपाल,मुख्यमंत्रीसमवेतच या मान्यवरांची असणार उपस्थिती

आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा दिवस आहे कारण की आज राज्यातील प्रगत शेतकऱ्यांचा पुरस्कार (Farmer Award) देऊन सन्मान केला जाणार आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेती क्षेत्रात (Farming Sector) नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय अशी कामगिरी करणाऱ्या बळीराजाचा (Farmer) महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत (Agriculture Ministry Of Maharashtra) वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मान (Agriculture Award) केला जाणार आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
thackeray

thackeray

आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा दिवस आहे कारण की आज राज्यातील प्रगत शेतकऱ्यांचा पुरस्कार (Farmer Award) देऊन सन्मान केला जाणार आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेती क्षेत्रात (Farming Sector) नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय अशी कामगिरी करणाऱ्या बळीराजाचा (Farmer) महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत (Agriculture Ministry Of Maharashtra) वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मान (Agriculture Award) केला जाणार आहे.

आजचा हा बळीराजाचा सन्मान सोहळा नाशकात (Nashik) मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. यामुळे सर्व राज्याचे याकडे लक्ष लागून आहे. या शेतकरी सन्मान सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची हजेरी बघायला मिळणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे (Governor Hon'ble Bhagat Singh Koshyari) राज्यपाल माननीय भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब (Hon'ble Chief Minister Uddhavji Thackeray) यांची उपस्थिती प्रमुख असणार आहे.

मित्रांनो या शेतकरी पुरस्कार सोहळ्यात राज्यातील एकूण 198 शेतकऱ्यांचा गुणगौरव केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास या लक्षणीय कार्यक्रमांची सुरवात होणार आहे. हा सोहळा नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हसरुळ याठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दादाजी दगडू भुसे यांनी देखील राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना या कृषी पुरस्कार सोहळ्यात अधिकाधिक प्रमाणात हजेरी लावण्याचे आव्हान केले आहे.

या कार्यक्रमास राज्यपाल व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या समवेतचच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ रोजगार हमी, फलोत्पादन संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे हे मंत्री देखील कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी व्यासपीठावर विराजमान असतील. यामुळे निश्चितच या सोहळ्याला चांगले भव्य रूप लाभणार असल्याचे सांगितले जात आहे.

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे गत दोन वर्ष कोरोना मुळे दरवर्षी कृषी विभागाकडून दिले जाणारे पुरस्कार प्रदान करता येणे शक्य नव्हते. यामुळे या वर्षी 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे दिले जाणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक पुरस्कारांचा समावेश असणार आहे. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न अशा इत्यादी पुरस्कारांचा समावेश केला गेला आहे. निश्चितच आज प्रगतिशील शेतकऱ्यांचा राज्यस्तरावर एक मोठा सन्मान सोहळा पार पडणार आहे. यामुळे कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याचा आज खऱ्या अर्थाने गुणगौरव होणार आहे.

English Summary: Farmer Award: Baliraja to be honored in Nashik; These dignitaries will be present along with the Governor and Chief Minister Published on: 02 May 2022, 10:20 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters