सध्या पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक कार घेत आहेत. भारतातील इलेक्ट्रिक कार कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढत आहे. यामुळे बाजारात अनेक इलेक्ट्रिक गाड्यांचे पर्याय उपलब्ध होत आहेत. यामुळे याला अनेकजण पसंती देत आहेत.
सध्या बजेट रेंजमध्ये इलेक्ट्रिक कारसाठी फारशी स्पर्धा नाही. यामुळे अनेकजण या गाड्या खरेदी करतात. असे असताना आता मर्सिडीज प्रीमियम लक्झरी श्रेणीतील एक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मर्सिडीजने एका कारचा टीझर रिलीज केला आहे. यामुळे याची उत्सुकता वाढली आहे. यामुळे आता याची किंमत किती असेल आणि आणि या गाडीची रेंज किती असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टीझरमध्ये कंपनीने सांगितले की, या कारचे लॉन्चिंग 24 ऑगस्टला होणार आहे. ही एक वेगळ्या प्रकारची कार असेल. कंपनीने टीझरमध्ये म्हटले आहे की इलेक्ट्रिकच्या खऱ्या पॉवरसाठी सज्ज व्हा. यामुळे उत्सुकता अजूनच वाढली आहे. सध्या महागड्या गाड्या देखील इलेक्ट्रिकमध्ये उपलब्ध झाल्याने अनेकांनी याला पसंती दिली आहे.
यामध्ये आता मर्सिडीज आपली नवीन इलेक्ट्रिक कार EQS लॉन्च करणार आहे. कंपनीची ही इलेक्ट्रिक कार खूप पॉवरफुल असणार आहे. टीझरमध्ये तर ही कार हवेसोबत उडताना किंवा हवेशी बोलताना दाखवली आहे. यामुळे ही एक ताकदवान कार असणार आहे.
आजच निवडणूका झाल्या तर काय? राज्यात भाजपचे होणार पानिपत, धक्कादायक सर्व्हे आला समोर..
या कारच्या टीझरमध्ये ही कार हवेत तरंगत असल्याचे दाखवले आहे. सध्याच्या घडीला ती इतर इलेक्ट्रिक कारच्या पुढे असेल. मर्सिडीजसह, BMW आणि Volvo सारख्या लक्झरी कार निर्मात्यांच्या देखील बाजारात इलेक्ट्रिक कार आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांची काळजीच मिटली! उजनी 100 टक्के भरले..
तुमच्या कारमधील एअरबॅगची किंमत किती माहितेय? नितीन गडकरींचे उत्तर सांगून तुम्हाला धक्काच बसेल
आकडा टाकणारांनो सावधान! महावितरण ठेवणार करडी नजर, 131 कोटींच्या विजचोऱ्या उघडकीस
Share your comments